राजुरा….
लाल लाल लहराऐंगे, आगे बढते जायेंगे चा
उदघोष
* आयटकचा शताब्दी दिन उत्साहात साजरा
राजुरा.
ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस ( आयटक ) या कामगार संघटनेला आज शंभर वर्ष पूर्ण झाल्याबद्दल राजुरा तालुक्यातील सास्ती,पोवणी १ व २, गोवरी, धोपटाला, बल्लारपूर, गोवरी डीप, सास्ती भूमिगत खाण या सर्व आठही कोळसा खाणीत हा दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त माईन्स व कॉलनी परिसरात पताका,तोरण लावून या शताब्दी दिनाचे स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमात मोठ्या संख्येने वेकोली कामगार व अधिकारी उपस्थित होते.
आयटक या कामगार संघटनेचे वेकोलीच्या बल्लारपूर क्षेत्रात उल्लेखनीय कार्य असून कामगारांच्या हक्कासाठी प्रभावीपणे लढणारी संघटना म्हणून तिचा नावलौकिक आहे. या लाल झेंड्याखाली कामगारांचा आपल्या न्याय मागण्यासाठी सतत संघर्ष सुरू आहे. आज शताब्दी दिन असल्याने या निमित्त झालेल्या कार्यक्रमात कामगार मोठ्या संख्येने सहभागी झाले. यानिमित्त आज बल्लारपूर क्षेत्रातील सर्व कोळसा खाणीत ध्वजारोहण झाले. यावेळी जोरदार घोषणा देत या दिनाचे सर्व कामगारांनी स्वागत केले. ध्वजारोहणानंतर खाण व्यवस्थापक व इंटक,बीएमएस,एचएमएस व सिटू या कामगार संघटनांच्या प्रतिनिधींनी शुभेच्छा देऊन आपले मनोगत व्यक्त केले.
सास्ती कोळसा खाणीत आज सेवानिवृत्त होत असलेले आनंद कोरडे व गोवर्धन रासेकर यांनी ध्वजारोहण केले. यावेळी व्यवस्थापक व्ही. दयाकर,दिलीप कनकुलवार, बादल गरगेलवार, विजय कानकाटे,गणेश नाथे यांनी आपले विचार व्यक्त करून शुभेच्छा दिल्या. रवी डाहुले, दिनेश जावरे, अशोक चिवंडे, उल्हास खुणे, शांताराम वांढरे, मधुकर डांगे, सातूर तिरूपती, आनंद झाडे,रंजन मोटेे,ईश्वर जांभुळे,प्रदीप रोगे, उमेश रामटेके,भास्कर कायरकर,बंडू मेश्राम,मधुकर विधाते,महेंद्र बोबडे, अशोक वेले यांच्यासह अनेक कार्यकर्ते व व कामगार उपस्थित होते. यावेळी जोरदार घोषणा देण्यात आल्या. ” लाल लाल लहराऐंगे,आगे बढते जायेंगे ” या घोषवाक्याने संपूर्ण परिसर दणाणून गेला.
सास्ती टाउनशिप येथील संयुक्त खदान मजदूर संघाच्या कार्यालयात क्षेत्रीय अध्यक्ष मधुकर ठाकरे यांचे हस्ते ध्वजारोहन झाले. पोवणी येथे श्री.सिंग,गोवरी डीप येथे एल. बी.राहिकवार,बल्लारपूर भद्रय्या नातारकी यांचे हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी देविदास महाकाळकर, गुलाब टेम्भुरणे,गंगाधर बोबडे, भाऊराव लांडे, विनोद देरकर,ए. डी. नागदेवते, रमेश अंगुरी, ज्ञानेश्वर मुरकुटे, तुकाराम ढवळे, दिलीप देरकर, गजानन धकाते,अनिरुद्ध मेश्राम यांचेसह मोठ्या संख्येने कामगार व कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रतिकार न्यूज