चंद्रपूर…..
चंद्रपूर जिल्ह्यातील पहीली केस आहे.ती एका कर्मचाऱ्याने करून सर्वांना चकीत केले तेे नौकरी करीत असताना ,तेे सतत अन्यायाविरुद्ध लढण्याची त्यांची वृत्ती आहे.म्हणूनच शासनाच्या तिजोरीत लाखोंची वसुली करुन दिली.त्यात विनोद खोब्रागडे यांचा सिंहाचा वाटा आहे.
खोटी कागदपत्रे तयार करुन सरकारी आणि खाजगी जमिन बळकावल्याच्या आरोपावरुन रामनगर पोलिस स्टेशन येथे सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये शास्त्रीनगर येथील सुलोचना खांडरे, प्रविण खांडरे, अतूल खांडरे, मुंबई येथील प्रशांत धात्रक, स्वाती धात्रक, तेजस धात्रक यांचा समावेश असून यापैकी कोणालाही अटक करण्यात आली नाही. तथापि अटकेपासून सुटका करण्यासाठी खांडरे कुटूंबियांनी न्यायालयामध्ये अग्रिम जमानतीसाठी याचिका दाखल केली असून यावर ६ नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे. तक्रारकर्ते खोब्रागडे यांच्या पत्नीच्या नावे वरवट येथे १.४८ हेक्टर शेतीची जमिन आहे. जी त्यानी काकूकडून खरेदी केली होती. खोब्रागडे यांच्यानुसार आता ती जमिन त्यांची पत्नी अनुच्या नावे असून याचा सातबारा देखील आपल्याकडे असल्याचे त्यांनी सांगितले. ते स्वतः तलाठी असल्याने एक कागद त्यांच्या हाती लागला ज्यामध्ये १.४८ हे जमिनीची खरेदीची नोंद होती. ज्यात त्यांच्या पत्नीच्या नावाचा समावेश होता. जमिनी खरेदी-विक्रीचा हा सौदा खोट्या कागदपत्राच्या आधारावर तसेच मुळ कागदामध्ये छेडछाड करुन करण्यात आला आहे. मुख्यत्वे यामध्ये जमिनीची रजिस्ट्री, फेरफार तसेच नवा सातबारा एकाच दिवसात करण्यात आला आहे. या जमिनीवर नंतर खांडरे व धात्रक कुटूंबाने मिळून गैर शेतीची जमिन घोषित करुन त्याचा ले-आऊट मंजुर केला. आणि त्याचे १०२ प्लॉट तयार करुन विकण्यात आले.
याबत अनेकदा विनोद खोबरागड़े यानी वरीष्ठ अधिकारी यांचेकडे तक्रार दाखल केली होती.
प्रतिकार न्यूज..