चंद्रपुर…
आ. सुधीर मुनगंटीवार यांनी वाहीली सरदार वल्लभभाई पटेल यांना आदरांजली*
लोहपुरुष भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती दिनानिमित्त माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी त्यांच्या प्रतिमेला मालार्पण करत आदरांजली वाहीली. सरदार वल्लभभाई पटेल यांनी भारताची एकता आणि अखंडता जपण्यासाठी आजन्म परिश्रम घेतले. त्यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिवस साजरा केला जातो. भारताची एकता आणि अखंडता कायम अबाधीत राहो, असे प्रतिपादन आ. मुनगंटीवार यांनी केले. यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, महानगर जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, भाजयुमो महानगर अध्यक्ष विशाल निंबाळकर, प्रकाश धारणे, सुभाष कासनगोट्टूवार, प्रज्वलंत कडू, सुरज पेदुलवार, यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
प्रतिकार न्यूज