विरुर….
सार्वजनिक बांधकाम विभागला आतातरी जाग येवू दे साठी गावकरी साकड़ घालनार ?
राजुरा तालुक्यातील काही गावांमध्ये जाऊन पहा मग लक्षात येतं की आपण रस्त्यावरुन जात आहोत की खड्ड्यातुन,असाच एक रोड आहे राजुरा ते चिंचोली बु राजुरा वरुन निघाले की पहिल्यांदा तुम्हाला परीक्षा द्यावी लागते ती म्हणजे खड्ड्यातून गाडी चालवत जाणे .वरुर पर्यंत तुम्हचे हातपाय दुखायला लागतील ,त्यानंतर तुम्हची गाडी पंक्चर होईल,असं होऊ नये म्हणून तुम्हाला रस्ते शोधत जाताना जेव्हा धानोरा मार्ग लागतो तेव्हा चिंचोली पर्यंत गाडीला पंचर होऊ न देणं यातून तुम्ही पास झाले की पुढचा प्रवास सुरु होणार ,या रोड बाबत गावातील नागरीकानी आपली व्यथा मांडली ,पंचेविस ,तीस वर्षे झालीत पण आम्ही निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधी यांना रोड कसे आहेत,याचे काही घेणं देणं नसल्याचं दिसून आले.सार्वजनिक बांधकाम विभाग ,असो की जील्हा परिषद असो ,कोनाताही अधिकारी ,कर्मचारी मुख्यालय राहत नाही या सर्व कर्मचारी बांधवाना दोक्यावर बसवून ठेवले आहे शासनाच्या योजना कीतीही चांगल्या असु द्या राबविणारे जर त्या निर्णयाची अंमलबजावणी करत नसेल तर चांगल्या योजनेचे तिनं तेरा वाजल्याशिवाय राहणार नाही आणि आज तेच चित्र पहावयास मिळत आहे.
प्रतिकार न्यूज