Home Breaking News सिंदेवाही.तहसील कार्यालयाचे आवारातुन रेती तस्कराची ट्रक्तर चोरुन नेल्याची तक्रार दाखल

सिंदेवाही.तहसील कार्यालयाचे आवारातुन रेती तस्कराची ट्रक्तर चोरुन नेल्याची तक्रार दाखल

47
0

सिंदेवाही…..

नागभिड तालुक्यातील रेती तस्कराची सिंदेवाही महसूल विभागाने जप्त केलेली ट्रॅक्टर तहसील कार्यालयाचे आवारातून चोरून नेल्याने सिंदेवाही पोलिस स्टेशनला F. I. R. दाखल.*
********

 

सुनील घाटे सिंदेवाही प्रतिनिधी
************

रेतीतस्करांवर अंकुश ठेवण्यासाठी महसूल अधिनियमाच्या अधिकारानूसार कडक कारवाई करण्याची सक्त गरज असल्याचे जाणवते आहे. कारण दिनांक- २७/१०/२०२० रोजी रात्रि १०-३० वाजता महसूल विभाग, सिंदेवाहीच्या नवनियूक्त तहसीलदार सुश्री पर्वणी पाटील यांचे आदेशानुसार तालुका मुख्यालयापासून ७ कि. मी. अंतरावरील पळसगांव ( जाट) येथे नायब तहसीलदार श्री. तोडकर यांचे नेतृत्वाखाली सिंदेवाहीचे राजस्व निरिक्षक, चार तलाठी आणि दोन कोटवार यांचे सहकार्याने रेती चोरनाऱ्या दोन ट्रॅक्टर ला पकडून, पळसगांव (जाट) येथेच चोरीची रेती भरलेल्या वाहनांचा पंचनामा केला. आणि रात्रोलाच अंदाजे ११-३० ते १२-०० वाजताचे दरम्यान दोन्ही ट्रॅक्टर तहसील चे आवारात जमा करून, रात्री ड्युटीवर असलेल्या शिपायाने लोखंडी गेटला ताला लाऊन तहसील कार्यालयात झोपी गेला. जमा केलेले ट्रॅक्टर सोनापूर (तुकूम) ता. सिंदेवाही येथील ताराचंद गायकवाड याचे मालकीचा असून ज्याचा क्रमांक- MH 34- AP- 1261 असा असून, तळोधी (बा.) तालुका नागभिड येथील सचिन वैद्य याचा असून ज्याचा क्रमांक- MH 36- G- 1307 असा आहे. सदरचा ट्रॅक्टर हा रात्रो ड्युटीवर असलेला शिपाई झोपी गेला असल्याचा फायदा घेत कुणीतरी कार्यालयीन कर्मचारी यांना हाताशी धरून, व आर्थीक व्यवहार करून, लोखंडी गेटला लावलेला ताला तोंडून सचिन वैद्य यांनी जप्त करण्यात आलेला ट्रॅक्टर चोरून नेला. ट्रॅक्टर चोरून नेला त्याबाबत दिवस उजाडल्यावर लक्षात आल्याने रात्र ड्युटीवर असलेल्या शिपायाने तहसीलदार सुश्री पर्वणी पाटील यांना भ्रमणध्वनीवर कळवीले. तेव्हा तहसील चे आवारातून जप्त केलेले ट्रॅक्टर रात्री २-०० ते ३-०० वाजताचे दरम्यान चोरी गेल्याने एकच खळबळ उडाली. त्यामुळे तहसीलदार मॅडम यांनी जप्ती पथकातील अधिकारी व कर्मचारी यांना बोलावून त्याची विचारपूस करून सचिन वैद्य याचे विरोधात सिंदेवाही पोलिस ठाण्यात F. I. R. दाखल करण्यास सांगितयाने नायब तहसीलदार श्री. तोडकर यांनी पो. स्टे. ला जाऊन, ट्रॅक्टर चोरून नेणाऱ्याचे विरोधात F. I. R. दाखल केला असून, अ. प. क्र. ४९३/२०२० नुसार तहसीलचे आवारातून ट्रॅक्टर चोरून नेल्याबद्दल कलम ३७९ नुसार गुन्हा दाखल केला असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. ट्रॅक्टर चोरीबाबत पुढील तपास एन. पी. सी. गेडेकर ब. क. नं.-५५८ हे करीत आहेत.

प्रतिकार न्यूज

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here