राजुरा….
राजुरा बाजार समितीच्या आवारात सोयाबीन विक्री करण्यासाठी आणलेल्या शेतकरी बांधवांची आर्थिक लूट.
राजूरा मार्केट मध्ये शेतकरी बांधवांची आर्थिक लूट केली जात आहे.आधीच शेतकरी अतीवृस्टीमुळे पिकाची नासाडी आणि हाती आलेले सोयाबीन हातचे गेले आणि उरलेले बाजारात विक्रीसाठी ठेवण्यात आले होते पण लीलाव करतांना शेतकरी बांधवांची मजबुरी लक्षात घेऊन त्यांच्या सोयाबीन मालाला फक्त सोळाशे रूपये भाव लीलाव करतांना बोली झाली .दुसरा माल साडेतीन हजार च्या खाली लीलावात बोली केली.काही व्यापारी बोली बोलतात काही पाहत असतात.त्या शेतकरी बांधवांची आर्थिक लूट केली गेली आहे.या बाबींकडे लक्ष देण्यास कोणीही तयार नाही.बाजार समीती बघ्याची भूमिका घेत आहे.असा आरोप शेतकरी बांधव करीत आहेत.झालेली नापीकी अणि मिळत असलेला भाव , शेतकरी बांधवांची मजबुरी आहे.शहरात काही ठिकाणी सोयाबीन खरेदी सुरु आहे.आधी मालाचा ढिगला टाकावा लागतो नंतर लीलाव करतात पण चांगल्या सोयाबीन ला सुध्दा भाव मिळत नाही.असा भोंगळ कारभार बाजार समितीच्या आवारात सुरू आहे.शेवटी सोयाबीन वापस नेण्याची पाळी शेतकरी बांधवांवर आली . सोयाबीन वापस नेत असणारे शेतकरी आर्वी गावचे असल्याचे समजते.
प्रतिकार न्यूज