सिदेवाही…. सुनिल घाटे द्वारा…
निकामी विद्युत पोलामुळे पुलाचे काम रखडलेे
विद्युत विभागाला जाग येईल का ! जनतेचा सवाल
सुनील घाटे सिंदेवाही प्रतिनिधी
सिंदेवाही तालुक्यातील वासेरा जामशाळा रोडवरील मोबाईल टावर च्या बाजूला निकामी 2 विद्युत पोल उभे असून त्यामुळे तेथील बाजूला असलेल्या पुलाचे काम रखडलेले आहेत,
सध्या मासळ ते पेडगाव रोड चे काम प्रगतीपथावर चालू असून, या रोड वरील पुलाचे काम चालू आहेत परंतु वासरे या जवळील टावर जवळ पूल बांधकाम होणे आवश्यक असताना त्या दोन विद्युत पुलामुळे संबंधित बांधकाम विभागाला पूल बांधण्याचे अडचण निर्माण होत आहे संबंधित ठेकेदाराने विद्युत विभागाला दोन-तीनदा पोल हटवण्याची मागणी केली परंतु विद्युत विभाग तो पोल हटवू राहिलेला नाही.
गावातून गेलेल्या नवराचे पाणी शेतकऱ्याच्या शेतात जाण्यास अडचण निर्माण होत आहे त्याच नोहरावर संबंधित रस्त्याचे काम सुरू असून नोहरा वर पूल होणे आवश्यक आहे.
मासाळ पेडगाव रस्त्यावरील बहुतेक पुलाचे कामे प्रगतीपथावर असून वासरा जवळ असलेल्या पुलाचे काम होणे आवश्यक असताना विद्युत विभागाच्या हेकेखोरपणा मुळे सदर पोल तिथेच आहे.
विद्युत पोल हटला नाही तर सदर पुलाचे काम होणार की नाही या विवंचनेत परिसरातील शेतकरी सापडलेला आहे विद्युत विभागाने पोल हटवून द्यावे.
प्रतिकार न्यूज