- सिंधुदुर्ग….
दिनांक १९ आक्टोबर २०२० पासून आजचा ९ वा दिवस सुरू असलेल्या
*घंटानाद आंदोलनाला कुडाळ – मालवण विधानसभा कॉंग्रेस पक्षाचे नेते चेतन उर्फ अरविंद मोंडकर यांची भेट…..
लवकरच महाराष्ट्राच्या ग्रामविकासमंत्री यांची भेट घेऊन प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन.
———————————-
दिनांक १९ आक्टोबर २०२० पासून आजचा ९ वा दिवस सुरू असलेल्या घंटानाद आंदोलनाला कुडाळ -मालवण विधानसभा कॉंग्रेस पक्षाचे नेते चेतन उर्फ अरविंद मोंडकर यांनी
गेले ९ दिवस जिल्हा मुख्यालय येथे दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासंघाचे अध्यक्ष रावजी यादव यांच्या नेतृत्वाखाली घंटानाद आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला मा. अरविंद मोंडकर यांनी भेट दिली. व आंदोलना मागील पार्श्वभूमी जाणून घेतली.
नाविन्यपूर्ण योजनेतून सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनुसूचित जाती, नवबौद्ध वस्त्यांमध्ये एकही योजना राबवली नाही,
हाफकिन संस्थेला एक कोटी रुपये देऊन दोन वर्षे होत आली तरी जिल्हा रुग्णालयाला आरोग्यविषयक मशिन, नेब्युलायझर, हिमोग्लोबिन मीटर उपकरणे आज अखेर प्राप्त झाली नाहीत. सर्वसाधारण गटाच्या नावाखाली 16 कोटी रुपये शासनाचे सर्व जीआर पायदळी तुडवून कोटींचा भ्रष्टाचार केला, आरोंदा सहकारी सोसायटी ने मयत लाभार्थ्यांच्या नावावरती रेशनिंग धान्य घोटाळा केला असल्याची माहिती रावजी यादव यांनी दिली असून अरविंद मोंडकर यांनी आपण या विषयात प्राधान्याने लक्ष घालून महाराष्ट्राचे कॉंग्रेसच्या मंत्रीमहोदयांची भेट घडवून हा विषय सोडवू असे सांगितले..
असल्याची माहिती आंदोलनकर्ते भारतीय बौद्ध महासंघाचे अध्यक्ष रावजी यादव यांनी दिली आहे.
प्रतिकार न्यूज