Home Breaking News बसपाने शाहूंच्या पुतळ्याची प्रतिकृती मेडिकल चौकात स्थापना केली

बसपाने शाहूंच्या पुतळ्याची प्रतिकृती मेडिकल चौकात स्थापना केली

10
0

Pratikar News

Nagpur :-    बहुजन राजे राजर्षी छत्रपती शाहू यांच्या 148 व्या जयंती निमित्ताने बहुजन समाज पार्टीच्या वतीने आज नागपूर च्या मेडिकल चौकात छत्रपती शाहूंच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या प्रतिकृतीची स्थापना करण्यात आली.
💐स्थापना करताना पोलीस व बसपा कार्यकर्ते यांच्यात थोडासा संघर्ष निर्माण झाला होता परंतु बसपा कार्यकर्त्यांनी पोलिसांना या मागील आपली भूमीका समजाउन सांगितली. पुतळ्याचा व स्मारकाचा वाद हा मनपाशी असल्याचे सांगितले त्यामुळे पोलिसांनी मवाळ भूमिका घेऊन पुतळ्याची प्रतिकृती चौकाच्या मध्यभागी स्थापन करण्यास तात्पुरती अनुमती दिली.
💐स्थानिक मेडिकल चौकात छत्रपती शाहूंचा पुतळा बसविण्यात यावा ही वीस वर्षापासून बसपाची मागणी असून 2002 ला नागपूर मनपाने एक ठराव घेऊन मेडिकल चौकात शाहूंच्या पुतळ्याला व स्मारकाला परवानगी सुद्धा दिलेली आहे. परंतु मागील वीस वर्षात भाजपा काँग्रेस च्या सरकार द्वारे त्यात काहीही प्रगती न झाल्याने बसपाने घोषित केल्यानुसार आज त्यांच्या जयंतीच्या कार्यक्रमाचे व प्रतिकृती स्थापन करण्याचे भव्य आयोजन करण्यात आले होते.
💐 या वर्षी नागपूर मनपा च्या निवडणुका होत आहेत. बसपा ने महापौर बनाव अभियान राबवले असून यावेळी बसपा आपला महापौर बनवून मेडिकल चौकातील नियोजित ठिकाणी छत्रपती शाहूंचे भव्य स्मारक व पूर्णाकृती पुतळा बसवून आपले अभिवचन पूर्ण करेल असा विश्वास याप्रसंगी बसपा नेत्यांनी व्यक्त केला.
💐कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बहुजन समाज पार्टी महाराष्ट्र प्रदेश च्या सचिव रंजनाताई ढोरे होत्या. प्रमुख उपस्थिती माजी प्रदेश सचिव उत्तम शेवडे, माजी जिल्हाध्यक्ष संदीप मेश्राम, विलास सोमकुवर, माजी शहर प्रभारी चंद्रशेखर कांबळे, शंकर थुल, माजी शहराध्यक्ष अमित सिंग, योगेश लांजेवार, माजी मनपा पक्षनेते गौतम पाटील, सदानंद जामगडे, प्रवीण पाटील, माजी महिला जिल्हा अध्यक्ष सुरेखा डोंगरे, वर्षा सहारे होते, ह्यांनी शाहूंच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला.
💐कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन वंजारी यांनी तर समारोप अभिलेश वाहने यांनी केला.
💐कार्यक्रमाला प्रकाश फुले, विलास मून, चंद्रसेन पाटील, सुनील सोनटक्के, सुमित जांभुळकर, अभय डोंगरे, बालचंद्र जगताप, परेश जामगडे, सुंदर भलावी, विकास नारायने, हर्षवर्धन जीभे, संभाजी लोखंडे, भानुदास ढोरे, मॅक्स बोधी, विनोद मेश्राम, राकेश जांभुळकर, संजय सायरे, अमित बागेश्वर, संजय वानखेडे, ओमप्रकाश शेवाळे, रवींद्र पाटील, आकाश कावळे, सचिन कुंभारे, श्रीकांत लिहीतकर, वीरेंद्र कापसे, जितेंद्र पाटील, शामराव तिरपुडे,असित दुर्गे, गौतम सरदार, सुनील डोंगरे,धरम ठाकूर, मुन्ना गजघाटे, इर्शाद भाई, आदि प्रमुख कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.
*✍️उत्तम शेवडे (9421800219)🐘*

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here