रामपूर येथे 43 लक्ष 72 हजार किंमतीच्या विकासकामे
राजुरा, वार्ताहर –
तालुक्यातील विविध गावांमध्ये जिल्हा परिषद अंतर्गत लाखो रुपयांचा निधी मंजूर करून आवश्यक मूलभूत सुविधांची पूर्तता करण्यासाठी सूनिल उरकुडे मागील तीन वर्षापासून सातत्याने प्रयत्नशील असून आज रामपूर सारख्या क्षेत्रफळाच्या विस्तारलेल्या शहरालगतच्या गावात 43 लाख 72 हजार रुपये किमतीच्या विकास कामाचे भूमिपूजन व लोकार्पण केले आहे. त्यांचा ग्रामीण भागातील जनतेप्रती असलेला सेवाभाव व विकास कामासंबंधी कार्यतत्परता यातून त्यांची जनसामान्यांमध्ये असलेली लोकप्रियता दिसून येत असल्याचे कौतुक करीत माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी रामपूर येथे आयोजित भूमिपूजन व लोकार्पण सोहळ्याप्रसंगी मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे उदघाटक हंसराज अहीर, माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री, प्रमुख अतिथी सत्कारमूर्ती सुनील उरकुडे माजी सभापती जिल्हा परिषद चंद्रपूर, वंदनाताई गौरकार, सरपंच रामपूर, सुनीता उरकुडे उपसरपंच रामपूर, ग्राम पंचायत सदस्य विलास कोदिरपाल, रमेश झाडे, जगदीश बुटले, हेमलताताई ताकसांडे, सिधुताई लोहे, शीतल मालेकर, लता डकरे, संगीता विधाते, कोलगाव सरपंच पुरुषोत्तम लांडे, हनुमान देवस्थान समितीचे अध्यक्ष गुलाब दुबे, मारोती जानवे, प्रकाश फुटाणे, सचिन शेंडे, रामा घटे उपस्थित होते.
यावेळी रामपूर येथे चार लाख किंमतीचा सिमेंट काँक्रीट रोड, आठ लाख किंमतीची सिमेंट काँक्रीट नाली, सात लाख किंमतीचा आर.ओ. वॉटर प्लांट, बारा लाख किंमतीची वर्गखोली बांधकाम, नऊ लाख किंमतीचे मंदिर परिसराला प्रिकॉस्टचे कंपाऊंड, दीड लाखाचा हायमास्ट व दोन लाख रूपये किमतीचे ओपन जिम अशा एकूण 43 लक्ष 72 हजार रुपये किंमतीच्या कामाचे भूमिपूजन व लोकार्पण करण्यात आले. याबरोबरच धिडशी व चार्ली येथे पाच पाच लक्ष किंमतीचे आरओ प्लांटचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी सुनील उरकुडे यांनी सांगितले की, जनतेनी दिलेल्या मतरुपी आशीर्वादाची परतफेड विकास कामांच्या माध्यमातून करीत असून भविष्यात सुद्धा ग्रामीण भागातील जनतेच्या विकासासाठी सतत प्रयत्नशील राहणार आहो. सरपंच वंदना गौरकार म्हणाल्या की, रामपूर वस्ती क्षेत्रफळाने विस्तारलेली असून गावाच्या विकासासाठी करोडो रुपये निधींची आवश्यकता असून हंसराज अहीर यांनी वेकोलीच्या माध्यमातून गावाच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देण्यास मदत करण्याची विनंती केली. यावेळी हंसराज अहीर यांनी सुनील उरकुडे यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला.
कार्यक्रमाला दिलीप ठेंगणे, मधुकर उरकुडे, किशोर शेंडे, रितेश पायपरे, कवडू ठेंगणे, मधुकर पोटे, अविनाश सावनकर, मारोती कायडींगे, रमेश गौरकार, बाबुराव जंपलवार, नामदेव गौरकार, गणेश हिंगाने, प्रभाकर लडके, शंकर निमकर, शंकर उरकुडे, प्रमोद पाणघाटे, मारोती ढुमणे सह रामपूर येथील नागरिक उपस्थित होते.
Pratikar News
—जुलै २३, २०२१
कोरपना :-
कोरपना तालुक्यातील कन्हाळगाव ग्रामपंचायत सरपंच,उपसरपंच व सदस्यांचा पाच वर्षाचा कार्यकाल २२ जुलै रोजी संपुष्टात आला.या निमित्ताने ग्रामसेवक सतीष मडावी व...