सातरी येथे सिमेंट रस्त्याचे सुनिल उरकुडे यांच्या हस्ते भूमिपूजन
राजुरा, वार्ताहर –
राजुरा तालुक्यातील सातरी येथील पाच लाख रुपये किंमतीच्या अंतर्गत सिमेंट रस्ता बांधकामाचे भूमिपूजन चंद्रपूर जिल्हा परिषद माजी सभापती सुनील उरकुडे यांनी केले.
यावेळी बोलतांना सुनील उरकुडे म्हणाले की, ग्रामीण भागात मूलभूत सुविधा पूर्ण करण्याच्या दृष्टीने शक्य त्या पद्धतीने विकास कामे करण्याचा आपण आपल्या कार्यकाळात प्रयत्न केला आहे. तालुक्यातील सर्व गावे रस्त्याने जोडली जाणे आवश्यक असून त्यातूनच गावाचा विकास साधला जाणार आहे.
या कार्यक्रम प्रसंगी सातरी सरपंच पद्मा वाघमारे, उपसरपंच भाऊराव बोबडे, ग्रामसेवक पारखी, प्रकाश बोढे, निशांत मून, वर्षा सातपुते, प्रांजली हेपट, बबीता टेकाम, पोलीस पाटील विजय पारशीवे, तंटामुक्त समिती अध्यक्ष अशोक चकोर, माजी सरपंच मंगेश मोरे, शंकर धुर्वे, मारोती कार्लेकर, अरुण कार्लेकर, बादल वाघमारे यांचेसह गावातील नागरिक उपस्थित होते.
Post Views:
17
बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121