प्रतिकार न्युज
निलेश नगराळे : २२ जुन २०२२
विभागिय आयुक्त नागपूर यांचेसोबत काष्ट्राईबची बैठक संपन्न
नागपूर- मागसवर्गियांचे सेवाविषयक प्रलंबित प्रश्न सोडविण्याबाबत, विभागिय आयुक्त नागपूर मा.माधवी खोडे(चवरे ) भा.प्र.से,यांचे अध्यक्षतेखाली काष्ट्राईब महासंघाची महत्वाची बैठक मा.अरुण गाडे,अध्यक्ष काष्ट्राईब महासंघ यांचे नेतृत्वात नागपूर विभागिय आयुक्त कार्यालयातील सभागृहात संपन्न झाली. यासभेत अनुसुचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार प्रलबित प्रकरणे तात्काळ निकाली काढणे,नागपूर विभागातिल सर्व जिल्ह्यातील सरळसेवा भरती अंतर्गत रिक्त पदे तात्काळ भरणे, शासन परिपत्रक 28मे 2008 शासन परिपत्रकानुसार मागासवर्गीय अधिकारी कर्मचारी यांना कार्यकारी पदावर नियुक्ती देणे,मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शैक्षणिक शिष्यवृत्ती वेळेवर देणे,सरकारी कार्यालयात तसेच शाळा महाविद्यालयामधे देवी -देवतांची फोटो सन्मानपपूर्वक काढणे,अव्वल कारकुन संवर्गातील कर्मचा-यांना नायब तहसीलदार पदावर पदोन्नती देणे,कृष्णा इंगळेच्या संघटनेला बेकायदेशीरपणे दिलेले कार्यालय काढून घेणे, 10,20व 30वर्ष सलग सेवा केलेल्या कर्मचा-याना कालबध्द पदोन्नती देणे,शासन आदेशाननुसार प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात संघटनेला स्वतंत्र कार्यालय देणे, या विषयावर सविस्स्तर चर्चा करण्यात येऊन कारवाईचे आदेश मा.विभागिय आयुक्तानी संबधित अधिका-यांना दिले.
बैठकीलामा.मिंलिदकुमार साळवे ,ऊपायुक्त मामान्य प्रशासन,मा.मंजूषाठवकर,ऊपायुक्त आस्थापना,व ईतर अधिकारी ऊपसस्थित होते तसेच काष्ट्राईब महासंघातर्फे सरचिटणिस गजानन थुल,जेष्ट ऊपाध्यक्ष शामरावजी हाडके, प्रसिध्दी सचिव सिताराम राठोड,काष्ट्राईब शिक्षक संघटनेचे कार्याध्यक्ष एम.एस. वानखेडे,ईंजी सुषमा भड,मा.एम.एस. जांभुळे,विभागिय अध्यक्ष यशवंत माटे ,जिल्हाध्यक्ष सिध्दार्थ ऊके,सचिव अशोक पाटील,व ईतर पदाधिकारी मोठ्या संख्येने ऊपस्थित होते.सिध्दार्थ ऊके यांनी मा.विभागिय आययुक्त व ऊपस्थित अधिका-यांचे आभार व्यक्त केले. *विनित, सिताराम राठोड, प्रसिध्दी सचिव*