Home Breaking News Chandrapur Crime: लग्नावरून वाद होताच प्रियकराचं टाळकं भडकलं, जे व्हायला नको तेच...

Chandrapur Crime: लग्नावरून वाद होताच प्रियकराचं टाळकं भडकलं, जे व्हायला नको तेच घडलं; त्या थरारक घटनेने चंद्रपूर हादरले

14
0

Pratikar News

Nilesh Nagrale   – , Wed, 25 May 2022

चंद्रपूर: चंद्रपुरात (chandrapur) अत्यंत थरारक घटना घडली आहे. लग्नावरून वाद झाल्याने संतापलेल्या प्रियकराने प्रेयसीवर चाकू हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रियकराने प्रेयसीवर चाकू हल्ला केला. त्यानंतर स्वत:ही हाताची नस कापून घेतली. त्यामुळे दोघेही रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. त्यांना तात्काळ रुग्णालयात (hospital) दाखल करण्यात आले आहे. चाकूचा वार मुलीच्या मानेवर लागल्याने ती सुरक्षित असून दोघांवरही रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काल दुपारी ही धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून दोघांचीही कसून चौकशी केली जात आहे. या घटनेमागे आणखी काही अँगल आहेत का? याचा तपास पोलीस करत आहेत. शिवाय लग्नाच्या (marriage) मुद्द्यावरूनच दोघांची भांडणं झाली की भांडणाचं आणखी काही कारण आहे याचाही पोलीस तपास करत आहेत. मात्र, सध्या या दोघांचीही प्रकृती स्थिर असल्याचं सांगितलं जात आहे.

प्रियकराचे नाव अजय कांबळे असं आहे. अजय आणि त्याची प्रेयसी हे दोघेही गडचांदूर येथील रहिवासी आहेत. चंद्रपूरच्यी जिवती तालुक्यातील माणिकगड किल्ल्यावर काल दुपारी हे दोघेही फिरायला गेले होते. यावेळी गप्पा मारत असताना त्यांच्यात लग्नाचा विषय निघाला. त्यावरून दोघांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. या संतापाच्या भरात अजयने चाकू काढला आणि प्रेयसीवर चाकूने सपासप वार केले. सुदैवाने या मुलीच्या मानेवर चाकूचे वार बसले. चाकूचे हलके वार बसल्याने ही मुलगी सुरक्षित आहे. प्रेयसीवर हल्ला केल्यानंतर त्यानेही स्वत:च्या हाताच्या नसा कापून घेतल्या.

आरडाओरडा झाल्याने बचावले
अचानक प्रियकराने चाकू हल्ला केल्यामुळे ही मुलगी भयभीत झाली. तिने जोरजोरात आरडाओरड सुरू केली. तेवढ्यात अजने हाताच्या नसा कापल्याने रक्ताच्या चिरकांड्या उडाल्या. त्यामुळे त्याची प्रेयसी अधिकच घाबरली. तिने आणखीनच जोरजोरात आरडाओरड केली. त्यामुळे आजूबाजूच्या लोकांनी धावत येऊन त्यांना मदत केली. या दोघांनाही तातडीने गडचांदूर येथील प्राथमिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, तिथून त्यांना चंद्रपूरच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या दोघांवरही उपचार सुरू असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचं त्यांच्यावर उपचार करणाऱ्या वैद्यकीय सूत्रांनी सांगितलं.

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here