Home Breaking News आता जगणं, मरणं यांच्याचसोबत! गुरुजींना घेऊन विद्यार्थिनी फरार; अजब प्रेमाची गजब कहाणी

आता जगणं, मरणं यांच्याचसोबत! गुरुजींना घेऊन विद्यार्थिनी फरार; अजब प्रेमाची गजब कहाणी

33
0

Pratikar News

By Nilesh  Nagrale  |  May 08, 2022

बेतिया: बिहारच्या बेतियामध्ये एक अजब घटना घडली आहे. एका तरुणीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या तरुणीचं नाव काजल आहे. व्हिडीओमध्ये ती स्वत:च्या लग्नाबद्दल बोलत आहे. मी माझ्या प्रियकर शिक्षकाला घेऊन पळाले आहे. माझे आई, वडील, भाऊ या लग्नाच्या विरोधात आहेत. त्यामुळे माझ्याकडे पळून जाण्याशिवाय पर्याय नव्हता, असं काजलनं व्हायरल व्हिडीओमध्ये म्हटलं आहे.

काजल (१९ वर्षे) काही दिवसांपूर्वी घरातून पळाली. तिनं लिहिलेलं पत्र आणि तिचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ‘माझे आणि गुरुजींचे बऱ्याच दिवसांपासून प्रेमसंबंध होते. मी त्यांच्याकडे कोचिंगला जायचे. तेव्हापासून आमच्यात संवाद सुरू झाला. तीन महिन्यांपूर्वी मी शिकवणीला जायचं बंद केलं. मी आणि गुरुजी संपर्कात होतो. मात्र माझ्या कुटुंबीयांचा याला विरोध होता. त्यांनी यावरून मला मारहाण केली,’ असं काजलनं व्हिडीओमध्ये म्हटलं आहे.

‘मी माझ्या प्रियकराला, शिक्षक बंधू चौधरींना घेऊन पळाले आहे. आता मी जगेन तर बंधू चौधरींसोबत आणि मरेन तर बंधू चौधरींसोबत. माझे कुटुंबीय मला मारण्याच्या तयारीत होते. मग मी काय केलं असतं? त्यामुळेच मी पळून यांच्याकडे आले आणि यांना पळवून नेलं. माझ्या कुटुंबीयांनी नवलपूर पोलीस ठाण्यात दाखल केलेली तक्रार खोटी आहे. मी आता यांच्याच सोबत राहीन. आम्ही लग्न केलं आहे,’ अशा शब्दांत काजलनं तिची अडचण आणि घटनाक्रम सांगितला.

काजल कुमारी बेतियाच्या नवलपूरची रहिवासी आहे. काजल कुमारी आणि शिक्षक बंधू चौधरी यांचे प्रेमसंबंध होते. घरच्यांचा विरोध असल्यानं काजल शिक्षक चौधरींना घेऊन फरार झाली. आता काजलनं तिच्या लग्नाचा व्हिडीओ व्हायरल केला आहे. तिच्या कुटुंबीयांना बंधू चौधरींविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून दोघांचा शोध सुरू आहे.

 

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here