Home आपला जिल्हा वंचित बहुजन आघाडीच्या तृतीय वर्धापन दिनानिमित्त पाणपोईचे थाटात उदघाटन

वंचित बहुजन आघाडीच्या तृतीय वर्धापन दिनानिमित्त पाणपोईचे थाटात उदघाटन

45
0

वंचित बहुजन आघाडीच्या तृतीय वर्धापन दिनानिमित्त पाणपोईचे थाटात उदघाटन…

राजुरा, 28 मार्च : वंचित बहुजन आघाडी या राजकीय पक्षाची स्थापना ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांनी 24 मार्च 2019 ला केली. या पक्षाला 2019 ला तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. वंचित चे तीन वर्षे पूर्ण झाल्याने संपूर्ण महाराष्ट्र राज्यात वंचित बहुजन आघाडीचा तृतीय वर्धापन दिन मोठ्या उत्साहात विविध कार्यक्रम आयोजित करून साजरा येत आहे. वंचित बहुजन आघाडी तर्फे 24 मार्च ते 31 मार्च ‘वर्धापन सप्ताह’ म्हणून साजरा करण्याचे योजिले आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातही वर्धापन सप्ताहानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. आज राजुरा येथील संविधान चौक येथे पाणपोईचे उदघाटन करण्यात आले. उन्हाची वाढती दाहकता लक्षात घेता वाटसरू ना भर उन्हात पाण्याची कुठलीही कमतरता भासू नये. याच पिण्याच्या पाण्यासाठी बहुजन समाजाला लढा द्यावा लागला होता. याचे किती महत्व आहे शब्दत व्यक्त करता येणार नाही. म्हणून चवदार पाणपोईचे उदघाटन करण्यात आले. पाणपोई च्या सोयीसाठी जिल्हा आयटी सेल प्रमुख अमोल राऊत यांनी मुख्य पुढाकार घेतला. राऊत यांच्या पुढाकारातून तालुक्याच्या ठिकाणी येणाऱ्या ग्रामीण भागातील नागरिकांना भर उन्हाळ्यात थंड पाणी प्यायला मिळावे, या उदात्त हेतूने तिसऱ्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून पाणपोई सुरू करण्यात आली.

यावेळी जिल्हाध्यक्ष भूषण फुसे, जिल्हा उपाध्यक्ष आनंदराव अंगलवार, जिल्हा आयटी प्रमुख अमोल राऊत, राजुरा तालुका अध्यक्ष सुशील मडावी, कोरपना तालुका अध्यक्ष मधुभाऊ चुनारकर, राजुरा तालुका महासचिव रविकिरण बावणे, महासचिव सदानंद मडावी, महासचिव प्रणित झाडे, चनाखा शाखाध्यक्ष रामराव वडस्कर, कविटपेठ शाखाध्यक्ष रामदास दुर्योधन, सचिव विजय बानोत, राजुरा तालुका उपाध्यक्ष धनंजय बोर्डे, सुरेंद्र फुसाटे, सुभाष हजारे, राहुल अंबादे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here