… विधानसभेत गुंजणार आदिवासींच्या लेआऊटचा प्रश्न…
राजुरा- बामनवाडा प्रकरण : आम. डॉ. होळी ना निवेदन.
………………………………….
जिल्ह्यातच नाहीतर महाराष्ट्रात गाजत असलेल्या बामनवाडा, राजुरा परिसरातील आदिवासींना वाटपात मिळालेल्या परंतू त्यावर धनदांडग्या गैर आदिवासींनी आदिवासीच्याच नावाने प्लांट पाडून केलेल्या विक्री प्रकरणाचे पडसाद शासन दरबारी पोहोचले आहे. या अवैध लेआऊट प्रकरणाला विधानसभेत वाचा फोडावी या साठी गोंडी मन समाजाचे सामाजिक कार्यकर्ते बापुराव मडावी, चुनाळा माजी सरपंच तथा सेवा सहकारी संस्था अध्यक्ष संजय पावडे, खामोना सरपंच हरिदास झाडे यांनी आमदार डॉ. देवराव होळी यांची गडचिरोली येथे भेट घेऊन निवेदन दिले आहे.
औद्योगिक दृष्ट्या विस्तारलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा-बामनवाडा, गडचांदूर परिसरातील धनदांडग्या गैर आदिवासीची नजर शहरालगत असलेल्या आदिवासी च्या वर्ग-२ जमिनीवर पडली.आदिवासींच्या अशिक्षित पणाचा फायदा घेऊन त्यांच्या जमिनी कवडीमोल भावाने विस्वासू आदिवासी च्या नावाने घेतल्या.त्यावर प्लाट टाकून विक्री केली व करोडोंची माया जमविली. मुळजमिन मालक व प्लाट विक्री करणारा मालक आजही दारीद्र्यात जगत आहे तर हा करोडोंच्या पैसा कुणाच्या घशात गेला याची चौकशी होणे गरजेचे आहे.
या अवैध लेआऊट प्रकरणात शासकीय अधिकारी- कर्मचारी यांचे साटेलोटे आहेत. भो.वर्ग-२च्या जमिनी असतांनाही त्या खरेदी-विक्रीला परवानगी देऊन, मुळ आदिवासींना भुमीहीन केले. यात शासनाचा लाखोंचा महसूल बुडाला. शासनाचे निकष डावलून पुरग्रस्त भागात लेआऊट ला परवानगी दिली.
आदिवासी च्या अवैध लेआऊट चे प्रकरण स्थानिक वृत्तपत्रांनी सतत लावून धरले. शिवसेनेचे तत्कालीन आम.बाळूभाऊ धानोरकर यांनी विधानसभेत प्रश्न लावून घरल्याने कोकण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्याची घोषणा शासनाने केली परंतु समितीचे घोडे कुठे अडले हे कळायला मार्ग नाही. या प्रकरणाला उजाळा मिळावा व अवैध लेआऊट प्रकरण पुन्हा विधानसभेत चर्चेला यावे यासाठी गडचिरोली घ्या आमदारांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले असून, आमदार लवकरच राजुरा-बामनवाडा परिसराला भेट देणार आहे.
Pratikar
Shilpa meshram
Kamthi
December 6, 2020
कामठी : येथील डॉ . बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक व संशोधन केंद्र येथे डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन...