Home राज्य अकोला जिल्हा परिषद वंचित बहुजन आघाडी च्या ताब्यात. बहूजणांनो स्वत:च्या इतिहासाचे साक्षीदार...

अकोला जिल्हा परिषद वंचित बहुजन आघाडी च्या ताब्यात. बहूजणांनो स्वत:च्या इतिहासाचे साक्षीदार व्हा…!!

126
0

** बहूजणांनो स्वत:च्या इतिहासाचे साक्षीदार व्हा…!!
—————————————-

महाराष्ट्रात ३४ जिल्हा परिषदा आहेत, त्यापैकी एकमेव अकोला जिल्हा परिषद ही वंचित बहूजन आघाडीच्या ताब्यात असलेली जिल्हा परिषद आहे…!!

अकोला जिल्हा परिषदेला एकदा भेट द्या तुमच्या लक्षात येईल की, अकोला जिल्हा परिषदेच्या एका प्रवेश द्वाराला डॉ बाबासाहेब आंबेडकर दुसऱ्या प्रवेश द्वाराला महात्मा ज्योतिबा फुले आणि मुख्य सभागृहाला छत्रपती शाहू महाराज यांचे नांव दिलें आहे…!!

ऐतिहासिक ठेवा ऊभा केला गेला आहे.

अकोला जिल्हा परिषदेच्या इमारतीच्या आवारात आल्यावर अनुभव होतो की, आम्ही फूले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रात राहतोय…!!

फुले शाहू आंबेडकरी विचारधारेचे राज्य कसे असते याचा इतिहास अकोला जिल्हा परिषदेच्या इमारतीच्या आवारात अनुभवायला मिळतो…!!

केवळ इमारतीला नांवे देऊन इतिहास ऊभा केला नाही तर महाराष्ट्रातील अकोला ही एकमेव जिल्हा परिषद अशी आहे की, अल्पभूधारक शेतकऱ्यांना सन २०१७ पासून सतत मोफत बि बियाणे वाटप करते आहे…!!

अकोला जिल्हा परिषद ही महाराष्ट्रातील एकमेव जिल्हा परिषद अशी आहे की, इथंच अपंगांना मानधन देण्याची योजना राबविली जाते…!!

महाराष्ट्रातील अकोला ही एकमेव जिल्हा परिषद अशी आहे की, इथं मुस्लिम समुदायातील पहिली महिला जिल्हा परिषद अध्यक्ष बनविल्या गेली…!!

महाराष्ट्रातील अकोला ही एकमेव जिल्हा परिषद अशी आहे की, इथंच कोळी समाजाचा महाराष्ट्रातील पहिला जिल्हा परिषद अध्यक्ष बनला आहे…!!

महाराष्ट्रातील अकोला ही एकमेव जिल्हा परिषद अशी आहे की इथंच तेली समाजाचा महाराष्ट्रातील पहिला जिल्हा परिषद अध्यक्ष बनविला गेला आहे…!!

महाराष्ट्रातील अकोला ही एकमेव जिल्हा परिषद अशी आहे की, इथंच बौद्ध समाजाचे चार जिल्हा परिषद अध्यक्ष बनले आहेत…!!

महाराष्ट्रातील उरलेल्या ३३ जिल्हा परिषदेच्या इमारती बघा, त्या जिल्हा परिषदेची कार्यपद्धती बघा.आणि सत्ताधारी पक्षांची नियत बघा…!!

पुरोगामीत्वाचा डंका पिटणारे, फुले शाहू आंबेडकरांचे नांव घेणारे, सेक्युलर असल्याचं ढोंग करणारे महाराष्ट्रात १९६० पासुन राज्य करीत आहेत मात्र प्रत्यक्षात त्यांना फुले शाहू आंबेडकरांचा इतिहास ऊभा करावा, वंचित बहूजन घटकांना सत्तेत सहभागी करुन घ्यावे असे वाटले नाही, तसा त्यांनी कधी प्रयत्न सुद्धा केला नाही आणि त्यांची तशी मानसिकता सुद्धा नाही …!!

बहूजन मित्रांनो आपल्या स्वतःचा इतिहास निर्माण करण्यासाठी, आपली अस्मिता कायम ठेवण्यासाठी, वंचित घटकांना सत्तेच्या दालनात घेऊन जाणारा वंचित बहूजन आघाडी हा एकच राजकीय पक्ष आहे ही खुणगाठ मनात पक्की करा…!!

येणाऱ्या काळात महाराष्ट्रातील जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत…!!

महाराष्ट्राचे पुरोगामी महाराष्ट्र हे नांव सार्थकी लावायचे असेल, वंचित घटकांना सत्तेच्या दालनात बसवायचे असेल तर वंचित बहूजन आघाडीची सत्ता ही आपल्या जिल्हा परिषदेमध्ये असलीच पाहिजे ही इर्षा वंचित बहूजन आघाडीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांने मनात रुजवली पाहिजे…!!
बहूजन सारे एक होऊ…!!
सत्ता आपल्या हाती घेऊ…!!
माझा पक्ष, सत्ताधारी पक्ष.
जयभीम.
@.. भास्कर भोजने.

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here