*अर्थ बजेट 2022 प्रतिक्रिया*
*अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचा अर्थ बजेट नसून अनर्थ बजेट आहे:- राजु झोडे*
२०२२ चा अर्थसंकल्प निर्मला सीतारामन यांनी आज लोकसभेत मांडला खरा पण हा अर्थसंकल्प शेतकरी, कामगार, व्यापारी, बेरोजगार व सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडणारा असून यामध्ये फक्त उद्योगपती व भाजपाप्रणीत हितचिंतक यांचाच विचार केलेला आहे. महागाईचा दर मोठ्या प्रमाणात वाढलेला असून महागाई कमी करण्यासाठी या अर्थसंकल्पात कोणतीही तरतूद केली गेली नाही. केवळ आकडे फुगवून अर्थसंकल्पाचा हवा भरलेला फुगा बनवण्याचे काम निर्मला सीतारामन यांनी आजच्या २०२२ अर्थ बजेट मध्ये मांडला असून हा अर्थसंकल्प देशातील जनतेच्या कोणत्याही कामाचा नाही. अशी प्रतिक्रिया २०२२ च्या अर्थ संकल्पाविषयी प्रसारमाध्यमांशी बोलतांना वंचित बहुजन आघाडीचे नेते राजू झोडे यांनी दिली.
तसेच सत्ताधारी यांचेकडून स्वागत करण्यात आले.
आहे.एकंदरीत विरोधी पक्ष कोणताही असो बजेट बाबत प्रतिक्रिया विरोधी असणार तर सत्ताधारी यांचेकडून बजेट बाबत चांगल्या प्रकारे तयार करण्यात आले ले बजेट असल्याचे मत व्यक्त केले.हे असेच चालायचे,