*’आझादी का अमृत महोत्सव’* निमित्याने *ए.पी.आय.अविनाश मेश्राम*
यांचा स्तुत्य उपक्रम
पोलिस स्टेशन शेगांव (बुज.) ता. वरोरा च्या वतीने ‘आझादी का अमृत महोत्सव’ निमित्ताने अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून *’वैज्ञानिक दृष्टीकोन व जादुटोणा विरोधी कायदा’* पोलिस स्टेशन शेगांव (बुज)च्या कार्यक्षेत्रातील गावांमध्ये पोहचविण्याचा उपक्रम *सहाय्यक पोलीस निरीक्षक मा. अविनाश मेश्राम* व *पोलिस उपनिरीक्षक मा. प्रविण जाधव* यांनी हाती घेतला आहे.
या उपक्रमाचा भाग म्हणून त्यांनी आजपर्यंत वरोरा तालुक्यातील शेगांव (बुज.), चारगांव (बुज), महालगांव, दादापूर, बेंबाळा, अर्जुनी,पारडी,पाचगांव(ठाकरे) गुजगव्हान,आब(वडगांव), चारगांव(खुर्द) भद्रावती तालुक्यातील पारोधी, कोकेवाडा(तु.), बिजोनी इत्यादी गावांमध्ये तेथील स्थानिक विविध महोत्सवाचे औचित्य साधून ‘वैज्ञानिक दृष्टीकोन व जादुटोणा विरोधी कायदा’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यासाठी अ. भा. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे महाराष्ट्र राज्य संघटक हरिभाऊ पाथोडे, चंद्रपूर जिल्हा संघटक अनिल दहागावकर, चंद्रपूर जिल्हा सचिव धनंजय तावाडे, सहसचिव अनिल लोनबले, चिमूर तालुका संघटक सारंग भिमटे, चिमूर तालुका सचिव किशोरशाह आत्राम हे वैज्ञानिक दृष्टिकोन, जादुटोणा विरोधी कायदा व चमत्कारामागील विज्ञान प्रात्यक्षिकासह समजावून सांगितले आहे. या उपक्रमाला स्थानिक जनतेचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. हा उपक्रम संपूर्ण जिल्ह्यात राबविण्यात आल्यास जादूटोण्याच्या नावाखाली होणाऱ्या मारहाणीच्या घटना थांबतील, भूत-भानामतीची भीती दूर होईल असा विश्वास स्थानिक जनतेकडून व्यक्त केल्या जात आहे.