कोठारी…
बामणी ते गोंडपिपरी राष्ट्रीय महामार्गावर जे ब्रेकर लावले आहेत त्त्या ब्रेकरमुळे अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरु आहे,वाहन चालकांना चांगला रोड़ तयार करण्यात आला आहे. परंतु ज्या मांनकाप्रमाणे ब्रेकर् तयार करायला पाहिजे तसे केले नसल्याचे दिसून येत आहे. ब्रेकरची उंची आणि अरुंद या प्रकारामुळे एखादी नवीन वाहन चालकाची नजर जर ब्रेकरवर गेली नाही तर वाहन उंच उसळून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयानुसार काम करायला पाहिजे परंतु बामणी ते गोंडपीपरी पर्यंत गावाजवळ ,शाळेजवळ लावलेले ब्रेकर काढून टाकून पुन्हा दुसरे नियमाप्रमाणे ब्रेकर बांधकाम करावे ,या पूर्वी चुकीच्या पद्धतीने बांधलेले ब्रेकर बाबत बबन रणदिवे उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. आणि उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशा प्रमाने शहरातील सर्व ब्रेकर तोडून ,पुन्हा दुसऱयांदा ब्रेकर बांधले आहेत पण या निर्णयाचा राष्ट्रीय महार्गाच्या कामावर असणाऱ्या अधिकारी वर्गाना विसर पडला की धकावरे शामराव,प्रमाणे ब्रेकर तयार केले का ?रोड़ चांगला असला की भरधाव वेगाने वाहन चालवताना पुढे ब्रेकर आल्यावर गाडी कंट्रोल होत नाही आणि टू व्हीलरवरून ब्रेकरवर आदळले कि अपघात होतो .राष्ट्रीय महामार्गावर सुरु असलेल्या अनेक ठिकाणी ,जे ब्रेकर लावले ते तोडून पुन्हा नवीन ब्रेकर तयार करण्यात यावे अशी मागणी होत आहे.
प्रतिकार न्युज
बातमी आपण वाचा ,दुसऱ्याना शेअर करा