भदन्त एस. प्रज्ञाबोधी ( महाथेरो)
*64 व्या धम्म चक्क अनुप्रवर्तन दिना निमित्त दि. 25 / 10 / 2020 रविवारी सकाळी 10 वाजता ” बुद्धभूमी मावसाळा ” ता.खुलताबाद येथे 64 वा धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन अशोक विजयादशमी निमित्ताने*
*धम्मध्वजाचे धम्म ध्वजारोहन भदंत एस. प्रज्ञाबोधी ( महाथेरो ) यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर समता सैनिक दल महिला शाखा मावसाळ्याच्या वतीने मानवंदना देण्यात आली*
*बुद्धभूमी मावसाळा येथील विश्वशांति बुद्ध विहारामध्ये*
*” भ. बुद्ध व डॉ. बाबासाहेब अंबेडकर यांच्या प्रतिमेची आणि अस्थिधातू कलशाची ” दिप, धूप, आणि पुष्पाने पूजा केली महाराष्ट्रातील ख्यातनाम, साहित्यिक, कवी, तथा समीक्षक, बोधीपर्ण प्रकाशनाचे प्रा.देवानंद पवार यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला त्या नंतर*
*भदंत एस. प्रज्ञाबोधी (महाथेरो)*
*यांनी उपस्थित बौद्ध उपासक व उपासिकांना त्रिसरणासह पंचशील प्रदान केले त्या नंतर भदंत सागरबोधी यांनी बुद्ध पूजा वंदना, त्रिरत्न वंदना, घेऊन सर्वांना मंत्र मुग्ध केले उपस्थितानां बुद्धभूमी मावसाळा चे संस्थापक अध्यक्ष भदंत एस. प्रज्ञाबोधी ( महाथेरो ) यांनी*
*22 प्रतिज्ञा दिल्या पुढे बोलताना भदंत एस. प्रज्ञाबोधी म्हणाले की ” माणसाला शिक्षणाची, जगण्याची, लढण्याची, नवीन जीवन जगण्याची ऊर्जा मिळाली ती फक्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर व त्यांनी दिलेल्या बौद्धधम्म या मुळेच ” होय असा संदेश यावेळी दिला*. *यावेळी मुकुंदवाडी, संजय नगर, अंबिकानगर, हनुमान नगर, हडको सिडको, औरंगाबाद शहरासह, कांचनवाडी, नक्षत्रवाडी, हिंदुस्तान आवास, विटखेडा, रांजणगाव, जोगेश्वरी, घाणेगाव बजाजनगर, माळीवाडा, दौलताबाद, खुलताबाद, सराई, भडजी, मनापुर, ताजनापुर, निरगुडी, पिंपरी, आखातवाडा, डोंगरगाव, अंधानेर, बनशेंद्रा, कन्नड, लामणगाव, पाडळसा, बामणी, गराडा, नंद्राबाद, सुलिभांजन, वेरूळ इत्यादी ठिकाणावरून बौद्ध जनसमुदाय उपासक-उपासिका मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. या वेळी प्रत्येक गावच्या महिलामंडळ यांनी अनेक प्रबोधन पर गीत सादर केले. शेवटी धम्मपालन गाथा घेऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. त्यानंतर उपस्थितांना भदंत एस. प्रज्ञाबोधी ( महाथेरो ) सह भिक्षू संघाकडून मंगल मैत्री अशिर्वाद देऊन कार्यक्रमा चा समारोप करण्यात आला आजचा कार्यक्रम औरंगाबाद मधील नंदनवन कॉलनी येथे वास्तव्यास असलेल्या बौद्ध उपासिका आयुष्यमती चंद्रकलाबाई पवार यांच्या वतीने दान दिलेल्या सी.सी.टी.व्ही. कॅमेरा च्या निगराणीखाली ” विश्वशांती बुद्धविहार बुद्धभूमी मावसाळा ” येथील संपूर्ण परिसर निगराणीखाली आहे.*
=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-= 💐💐💐