Home Breaking News शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी हे पॅकेज पुरेसं नाही, मुख्यमंत्र्यांनी उदारता दाखवावी : पंकजा...

शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी हे पॅकेज पुरेसं नाही, मुख्यमंत्र्यांनी उदारता दाखवावी : पंकजा मुंडे

5
0

25th October, 2020 20:36

बीड : 

विजयादशमीच्या मुहुर्तावर आज सावरगाव घाट येथे आयोजित दसरा (dussehra) मेळाव्यात भाजपा (bjp) नेत्या पंकजा मुंडे (pankaja munde) यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (chief minister udhav thackry) यांनी दहा हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले. मात्र, शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी हे पॅकेज पुरेसं नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अजून थोडी उदारता दाखवावी, असे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.

कोरोनाच्या (Coronavirus) पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांना ऑनलाइन मार्गदर्शन केले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी दहा हजार कोटींचं पॅकेज घोषित केले. मी त्यांचे स्वागत करते. मात्र शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी हे पॅकेज पुरेसं नाही. शेतकऱ्यांचे अत्यंत हाल झाले आहेत. शेतकऱ्यांसाठी योग्य निर्णय घ्यावा, अन्यथा विरोधी पक्षांना रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा पंकजा मुंडे यांनी यावेळी दिला.

निर्णय घेण्यासाठी फडात जावे लागत नाही
कुणीतरी म्हटलं उसतोड कामगारांचे निर्णय मुंबईत बसून होत नाहीत. उसतोड कामगारांचे निर्णय धाब्यावर बसून होतात का ? उतसतोड कामगारांचे निर्णय घेण्यासाठी फडातच जावे लागत असे नाही. पंकजा मुंडेंच्या विरोधात स्टेटमेंट केले की हेडलाईन होते. मुंडे साहेब साखर कारखानदार होते ते पण उसतोड कामगारांचे नेतृत्व करायचे. उसतोड कामगार स्वाभिमानी आहेत. 27 तारखेच्या बैठकीत जो निर्णय होईल ते जाहीर करा नाहीतर उसाच्या फडातून कामगार बाहेर आणू, असा इशारा त्यांनी दिला आहे.

रेसमध्ये जीव तुटेपर्यंत पळत राहील
पंकजा मुंडे म्हणाल्या, निवडणुकीत हरले. माझ्यापेक्षा पराभूत माझे कार्यकर्ते वाटतात. मी म्हटले काय तुम्ही मनावर घेतलंत. साहेब आपल्यातून गेले. यापेक्षा मोठी घटना आहे का ही. जिंदगी की रेस मे जो लोक आपको दौडकर हरा नही सकते. वो आपको तोडकर हराने मे लगते है. मी या रेसमध्ये जीव तुटेपर्यंत पळत राहील, असे पंकजा म्हणाल्या.

राज्यभर दौरा काढणार
मी महाराष्ट्रभर दौरा काढणार आहे, ज्याच्या डोळ्यात अश्रू आहेत. त्या माणसांसोबत पंकजा मुंडे आणि त्यांच्या कार्यकर्त्याला पोहोचावे लागणार आहे, असे पंकजा मुंडे म्हणाल्या.

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here