Home Breaking News आदिवासी बांधवाना समाज भवन उपलब्ध करून दिल्याने मनापासून समाधानी — माजी आमदार...

आदिवासी बांधवाना समाज भवन उपलब्ध करून दिल्याने मनापासून समाधानी — माजी आमदार अँड संजय धोटे*

114
0

*आदिवासी बांधवाना समाज भवन उपलब्ध करून दिल्याने मनापासून समाधानीमाजी आमदार अँड संजय धोटे*

*पाचगाव येथे आदिवासी समाज भवनाचे लोकार्पण संपन्न*

राजुरा तालुक्यातील पाचगाव येथील आदिवासी बांधव व पंचायत समिती सदस्य सौ सुनंदा डोंगे यांनी आदिवासी बांधवांसाठी भवनासाठी तत्कालीन आमदार अँड संजय धोटे यांच्या कडे मागणी केली होती,या मागणी दखल घेत माजी आमदार अँड संजय धोटे यांनी आपल्या कार्यकाळात आमदार स्थानिक विकास निधी अंतर्गत सन 2018 – 19 अंतर्गत 20 लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता,

आदिवासी समाज भवनाची ईमारत पूर्ण झाली असून त्या ईमारतीचा लोकार्पण सोहळा माजी आमदार अँड संजय धोटे यांच्या हस्ते करण्यात आला, यावेळी बोलताना अँड.संजय धोटे म्हणले की,मी आमदार असताना आदिवासी बांधव व या क्षेत्राच्या पंचायत समिती सदस्या सौ सुनंदा डोंगे हे माझ्या जनसंपर्क कार्यालयात येवून माझ्याकडे समाज भवनाची मागणी केली होती,मी या सर्व बाबीची माहिती घेतली व माझ्या आमदार स्थानिक विकास निधी अंतर्गत 20 लक्ष रुपये उपलब्ध करून दिले होते,ही ईमारत पुर्नपणे तयार झाली असून,या इमारतीचे लोकार्पण हे माझ्या हस्ते होत असून मी मनापासून समाधानी आहे,मी दिलेला हा निधी आदिवासी समाज बांधवांच्या कामात येत असेल तर त्या पेक्षा मोठा आनंद कोणता होऊ शकते,हे भवन आदिवासी समाजाला उपलब्ध करून दिले या गोष्टीचा मनपासून समाधानी आहे,आदिवासी बांधवांनी पुढे येऊन आपल्या समाजासाठी योगदान द्यावे असे ते बोलतांना सांगितले.

यावेळी माजी आमदार अँड संजय धोटे यांच्या सह अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले, यावेळी व्यासपीठावर माजी आमदार अँड संजय धोटे यांच्या सह पंचायत समिती सदस्य सौ सुनंदा डोंगे,गोंडवाना गणतंत्र पार्टीचे जिल्हाध्यक्ष बाबुराव मडावी,भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने,गोंडवाना गणतंत्र पार्टीचे तालुका अध्यक्ष अरुण उदे,भाजपा युवा नेते संदीप गायकवाड,हिरामोती मंडलचे शामराव कोटनाके,तंटामुक्तीचे अध्यक्ष सौ सुरेखा तलांडे गणेश शेडमाके, गुलाब किनाके,चिनू पाटील कुमरे,जंगा रायसिडाम, माजी सरपंच सौ शोभा सुरपाम, लिंगुजी मडावी,रामू मडावी,दौलत उईके,जलपती सुरमाप, बाबुराव मेश्राम,पराग दातरकर,लक्ष्मण धुवाधार, कुशाब परचाके, दादाजी मडावी,रामचंद्र शेडमाके,भगवान शेडमाके,विजय उईके,रामाजी आडे,भाऊजी मंडळी,पिसाजी पेंदोर,युवा मदे,मिथुन नूलावार,प्रशांत भेंडे तसेच गावातील तसेच परिसरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here