Home Breaking News कचऱ्यातून साकारली कला; मनपाने केले कौतुक मनपातर्फे “आझादी का महोत्सव मोहिमे”अंतर्गत...

कचऱ्यातून साकारली कला; मनपाने केले कौतुक मनपातर्फे “आझादी का महोत्सव मोहिमे”अंतर्गत उपक्रम; विजेत्यांना प्रमाणपत्र 

27
0

Pratikar News

चंद्रपूर, ता. २ : चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या माध्यमातून “आझादी का महोत्सव मोहिमे”अंतर्गत वेस्ट टू आर्ट (कचऱ्यातून कला) या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. घरामध्ये असलेल्या जुन्या वस्तू वापरल्या जात नाही. मात्र, जुन्या वस्तूंचा वापर करून विविध सजावटीच्या वस्तू साकारण्यात आल्या. निरुपयोगी काचेच्या बॉटल्सचा वापर करून सुंदर फ्लॉवर पॉट तयार केले. प्लास्टिक बॉटल्सचा वापर करून फेस्टिव डेकोरेशन बनविले. यासर्वांची प्रदर्शनी भरवून विजेत्या स्पर्धकांना स्मृतिचन्ह, प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

आजादी का अमृतमहोत्सव मोहिमेअंतर्गत १० सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या कालावधीत चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे वेस्ट टू आर्ट (कचऱ्यातून कला ) या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. यासाठी स्पर्धकांना कचऱ्यातून कला या संकल्पनेवर आधारित प्रकल्प तयार करून ऑनलाइन पद्धतीने २२ सप्टेंबर ते २८ सप्टेंबर या कालावधीत मेलवर मागविण्यात आले. प्राप्त झालेल्या एकूण प्रकल्पापैकी उत्कृष्ट अशा प्रकल्पांची निवड करून १ ऑक्टोबर २०२१ या उपक्रमा अंतर्गत कचऱ्यातून कला साहित्य प्रदर्शन भरविण्यात आले.

शनिवारी (ता. २) राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात विजेत्या ठरलेल्या स्पर्धकांना महापौर राखी संजय कंचर्लावार, आयुक्त राजेश मोहिते, स्थायी समिती सभापती रवी आसवानी यांच्या हस्ते स्मृतिचन्ह, प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

साहित्य प्रदर्शनीनंतर चंद्रपूर शहर महानगरपालिका चंद्रपूर तर्फे “आझादी का अमृत महोत्सव ” मोहिमेंतर्गत शहरात विविध प्रभागात  राबविण्यात आलेल्या कचरा विलगिकरण,एक दिवस इंधनविराहित ,इ- कचरा गोळा करणे,कचऱ्याचे विघटन करणे, स्वछतेवर नावीन्यपूर्ण संकल्पना , बेस्ट  प्रॅक्टिसेस इत्यादी  उपक्रमामध्ये उस्फुर्त सहभाग देऊन सहकार्य करणाऱ्या बेस्ट वेस्ट इंटप्रेनर्स,बेस्ट स्मॉल स्केल वेंडर्स ,बेस्ट सिटीझन्स,बेस्ट ग्रुप्स, बेस्ट SHGs, उपक्रमात सहकार्य करणारे इतर उत्कृष्ट घटक यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. कचरा कला साहित्य प्रदर्शनीसाठी स्पर्धेसाठी गट अ – शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थी, गट ब – इतर नागरिक अश्या दोन गटांमधून प्रत्येकी तीन उत्कृष्ट स्पर्धकांना निवडण्यात आले.  

विजेत्यांची नावे 
गट अ- शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थी 
– प्रथम क्रमांक – कु. श्रावणी बावणे, सावित्रीबाई फुले मनपा शाळा, चंद्रपूर
– द्वितीय क्रमांक – कु.याशिका पोटदुखे, पोद्दार शाळा चंद्रपूर,
तृतीय क्रमांक – सुकन्या खोब्रागडे, सावित्रीबाई फुले मनपा शाळा,चंद्रपूर 

गट ब- इतर नागरिक
प्रथम क्रमांक – डॉ. बी. एम. पालीवाल
द्वितीय क्रमांक – श्रीमती प्रीती बैराम
तृतीय क्रमांक – श्रीमती राधा चिंचोलकर

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here