Home Breaking News *🔥मोठी बातमी🔥* *💥 महाराष्ट्रात नाईट कर्फ्यू लागणार*

*🔥मोठी बातमी🔥* *💥 महाराष्ट्रात नाईट कर्फ्यू लागणार*

31
0

Pratikar News

महाराष्ट्रात नाईट कर्फ्यू लागणार, 

 
अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील : आरोग्यमंत्री राजेश टोपे
#
जालना, 29 ऑगस्ट : केंद्राने महाराष्ट्र राज्याला रात्रीच्या संचारबंदीची (Maharashtra Night Curfew) शिफारस केल्यानंतर महाराष्ट्र राज्यात अधिक काळजीची गरज असल्याचे मत आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी व्यक्त केलं. केरळमधील ओनम सणाच्या काळात झालेल्या कोरोना प्रादुर्भाव पाहता केंद्राच्या सुचनेची अंमलबाजावणी होईल, मात्र, याबाबत अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील (CM Udhav Thakrey) , अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी जालना येथे माध्यमांशी बोलताना दिली.
टोपे म्हणाले, केरळ राज्यातील ओनम सणामुळे वाढलेला कोरोना रुग्णांचा वाढता प्रादुर्भाव पाहता केंद्राने महाराष्ट्र राज्याला रात्रीच्या संचाबंदीची सूचना केलीय. आगामी काळात महाराष्ट्र राज्यातील सणवार पाहता या बाबत काळजी घेण्याची गरज असून केंद्राच्या सूचनेची अंमलबजावणी होईल. मात्र याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अंतिम निर्णय घेतील, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलीय.

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here