Home सांस्कृतिक राखी आली न…..चल निभवू पुनः आपल्या नात्याला…

राखी आली न…..चल निभवू पुनः आपल्या नात्याला…

41
0

चंद्राची चमक तेजाकडे

रोज चालली

खुलायचं म्हणाला आणखी

दिमाखात

पौर्णिमेला चेहरा उजवळायाचा म्हणी

भावा- बहिणीचा..

धागा तो रेशमी बांधून ठेवणारा

बंधन नव्हे ते

कैद करायला

आठवण देतो मनगटाच्या धमणीला

हृदयाकडे जाता येता

सुखरूप ठेव म्हणे

बहिणीच्या भाऊरायाला….

नातेही रेशमाचे

नाजूक जरी असले दिसायला

शाबूत राहील राखीच्या बंधनाने

आयुष्याची सुरुवात ते अंतही प्रेमानेच…

भाऊ कोणी असाच होत नाही बहिणीचा

रक्ताचे नातेच असावे असे काही नाही

हाक तुझी मिळू दे कधीही

मावळती असू दे की

उषा नवी उगवणारी

भाऊ येईल त्याच्याही आधी

संकट असू दे मोठे कितीही

निस्तारने त्याला प्रथम प्राधान्य…

नात्याचे विभाजक

कशाला आणतेस मध्ये ताई

भाऊ काही त्यात वेगळा नाहीच

जप फक्त तुझ्या सोज्वळ मनाला

उणे दुणे काढू नकोच

पवित्र नाते राखीचे आजच नाही

बालपण ते म्हातारपण

भाऊ बहीण साथ राहतील

एकाच ममतेच्या धाग्याला

राखी आलीननिलेश

चल निभवू पुनः आपल्या नात्याला…

✍️✍️✍️निलेश   नगराळे 

 

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here