Home क्राइम पैशाचा पाऊस पाडण्याचे प्रलोभन देत २७ वर्षीय तरुणीवर तिच्या इच्छेविरोधात लैंगिक शोषण...

पैशाचा पाऊस पाडण्याचे प्रलोभन देत २७ वर्षीय तरुणीवर तिच्या इच्छेविरोधात लैंगिक शोषण , तिघा संशयितांना पोलिसांनी ठोकल्‍या बेड्या

40
0

Pratikar News

नाशिक /
             पैशाचा पाऊस पाडण्याचे प्रलोभन देत एका २७ वर्षीय तरुणीवर तिच्या इच्छेविरोधात लैंगिक शोषण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पीडितेचा तक्रारीवरून पोलिसांनी तीन लोकांविरोधात गुन्हा दाखल करून तिघांना अटक केली आहे. आपण एकाच रात्रीतून श्रीमंत व्हावे अशी सगळ्यांची ईच्छा असते. आणि याच मानसिकतेचा फायदा काही लोकांकडून उचलल्या जात असून भोंदूबाबा त्यांना गंडवीत आहेत किंवा लैंगिक शोषण करीत आहेत. पोलिसांकडून नागरिकांना नेहमी अश्या लोकांपासून वाचून राहण्याच्या सूचना दिल्या जातात. तरी देखील लोक पैशाच्या आमिषाला बळी पडून यांच्या जाळयात अडकतात.

पूजेच्‍या बहाण्याने केला अत्याचार

पैश्‍यांचा पाऊस पाडण्यासाठी संशयितांनी पीडीतेला प्रत्‍येक बुधवारी पूजा करण्यास सांगितले. त्‍यानुसार गंगापूर गावातील पठाडे गल्‍ली येथील जामा मस्‍जीदच्‍या शेजारी असलेल्‍या पत्र्याच्‍या घरात तिला डिसेंबर २०२० च्‍या तिसऱ्या आठवड्यात बोलविण्यात आले.

घटनेतील संशयित काममिल गुलाम यासिन शेख याने पैश्‍याचा पाऊस पाडण्याचे खोटे आश्‍वासन देतांना पूजेच्‍या बहाण्याने पीडीतेला निवस्‍त्र केले. खोटी पुजा मांडून ओठाने मंत्र पुटपुटत मंत्र म्‍हणून पीडीतेच्‍या अंगावरुन नारळाचा उतारा करत इच्‍छेविरुध्द शरीर संबंध प्रस्‍थापित केले. हा सर्व प्रकार पुढील तीन आठवड्यांच्‍या बुधवारी सुरु राहिला. या कृत्‍यासाठी संशयित शेखसह अन्‍य दोघे संशयित फर्नांडिस व भुजबळ यांनी मदत केल्‍याने त्‍यांच्‍या विरोधात गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे. या तिघा संशयितांना पोलिसांनी ताब्‍यात घेतले आहे.

इच्‍छेविरुद्ध वारंवार शरीर संबंध, तिघा संशयितांना पोलिसांनी ठोकल्‍या बेड्या

पीडीतेने दिलेल्‍या फिर्यादित म्‍हटले आहे, की गेल्‍या १३ डिसेंबर २०२० पासून ९ जानेवारी २०२१ या कालावधीत संशयितांनी पैश्‍यांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवतांना इच्‍छेविरुद्ध शरीर संबंध प्रस्‍थापित केले. यासंदर्भात पीडीतेने गंगापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, घटनेतील तिघा संशयितांना पोलिसांनी बेड्या ठोकल्‍या आहेतकामिल गुलाम यासिन शेख (वय २९, रा. लालगंज ता.दालकोटा, जि. उत्तर प्रदेश जनाजपुर, पश्‍चिम बंगाल व सध्या जामा मशीद समोर पठाडे गल्ली, गंगापूर गाव), स्‍टॅलीस्‍टींग उर्फ शिवराम जेम्‍स फर्नांडिस (वय ५६, मुळ रा. जंगारेस्‍टयुड्डू जि. पश्‍चिम गोदावरी, आंध्रप्रदेश व सध्या कमलनगर, कामठवाडा, नाशिक) व अशोक नामदेव भुजबळ (वय ६३, रा.राधाकृष्णनगर, सातपूर) असे अटक केलेल्‍या तिघा संशयितांची नावे आहेत.

.

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here