Home क्राइम दारूचा धंदा चालू देतो; दोन हजाराची लाच मागणाऱ्या पोलिसाविरुद्ध गुन्हा दाखल

दारूचा धंदा चालू देतो; दोन हजाराची लाच मागणाऱ्या पोलिसाविरुद्ध गुन्हा दाखल

42
0

Pratikar News

बार्शीटाकळी : पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत पोलिस हवालदार अरुण गावंडे वय 55 वर्षे याने एका व्यक्तीला दारूचा धंदा चालू ठेवू देण्यासाठी दोन हजार रुपये लाचेची मागणी केल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत सविस्तर माहिती अशी की बार्शीटाकळी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या कान्हेरी सरप येथील एका 30 वर्षीय पुरुषाला त्याचा दारूचा धंदा करू देण्यासाठी तसेच एमपीडीए ची कार्यवाही करण्याची भीती दाखवून दोन हजार रुपये लाचेची मागणी पोलीस हवालदार अरुण गावंडे याने केली, याबाबतची तक्रार संबंधित व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. त्यावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 12 ऑगस्ट रोजी याबाबतची पडताळणी केली. मंगळवारी कान्हेरी सरप येथे तक्रारदाराच्या घरासमोर पोलीस हवालदार लाचेची रक्कम मागण्यासाठी आला होता. परंतु त्याला संशय आल्याने रक्कम स्वीकारली नाही. पडताळणी झालेली असल्याने तक्रारदाराच्या तक्रारीवरून आरोपी पोलिस हवालदार याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात येत आहे.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधिक्षक विशाल गायकवाड, अप्पर पोलीस अधीक्षक अरुण सावंत यांच्या मार्गदर्शनात तपास अधिकारी शरद एस. मेमाने व त्यांचे सहकारी पोलीस अंमलदार सुनील येलोने, राहुल इंगळे यांनी केली.
—————

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here