आर्णी (जि. यवतमाळ) : जिल्ह्यातील अंजीनाईक (anjinaik arni) येथे महाप्रसादामधून ४० जणांना विषबाधा (food poison yavatmal) झाल्याची घटना घडली. सर्वांनी सकाळी सात वाजतापासून आर्णी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. यामध्ये वृद्ध महिला, पुरुष यांच्यासह लहान मुलांचाही समावेश आहे.
अंजीनाईक येथील धनसिंग सकरु राठोड यांच्या घरी दत्त महाराजाच्या पोती वाचन होते. १६ ऑगस्टला दत्त महाराजाच्या पोती वाचन समाप्ती झाली. त्यानंतर सायंकाळी सात वाजेदरम्यान महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर अनेकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला. त्यांना १७ ऑगस्टला मध्यरात्रीपासून हगवण आणि उलट्यांचा त्रास सुरू झाला. त्यामुळे सर्वांनी आर्णी येथील ग्रामीण रुग्णालय गाठले.
महाप्रसादातून विषबाधा झालेल्या नागरिकांची नावे –
राजू कीसन पवार (वय-50), विष्णू मेसचंद चव्हाण(वय-68), विशाल कीसन चव्हाण(वय-25), खुशाल कीसन चव्हाण (वय-25), गणेश धनसिंग राठोड (वय-38), छकूली विशाल चव्हाण(वय-19), कीरण दिनेश राठोड(वय-23), विवेक उमेश राठोड (वय-14), ममता युवराज चव्हाण(वय-24), जीवन युवराज चव्हाण(वय-9), सुखदेव नामदेव चव्हाण (वय-45), विवेक मनिष राठोड(वय-7), मोहन राठोड (वय-66), शोभाबाई धनसिंग राठोड (वय-60), गोदाबाई मधूकर राठोड (वय-50), भूमिका रविद्र राठोड(वय-19), शितल अरविंद राठोड(वय-20), रेखा राजेश राठोड(व-25), प्रतिक्षा रविद्र राठोड(वय-12), पदमा रविद्र राठोड (वय-25), कलीबाई कीसन चव्हाण (वय-40), हिरासिंग परसराम पवार(वय-45), कीसन मेरसिंग चव्हाण(वय-55), प्रविण दत्ता राठोड (वय-21), संजय अजाबराव राठोड(वय-35), मनिष सूखदेव राठोड(वय-34), सुरेश दत्ता राठोड(वय-38), धिरज सूरज राठोड(वय-14), सुरेश रामजी राठोड (वय-43), हर्षद सूरेश राठोड(वय-15), मंजीधर्मा चव्हाण(वय-69), बलदेव नारायण चव्हाण (वय-50), सुनिता उमेश राठोड(वय-30), निर्मला मोहन राठोड(वय-40), विवेक हनसाजी राठोड (वय-21), नर्मदा वामन जाधव (वय-35), वामन हम्या जाधव (वय-45), योगीता रविद्र राठोड (वय-8), राजेद्र ग़णेश राठोड(वय-4), जितेद्र गणेश राठोड