Home Breaking News प्रेमी युगुलांना लुटणाऱ्या टोळीला अटक, प्रेयसीसोबत करायचे अश्लील चाळे

प्रेमी युगुलांना लुटणाऱ्या टोळीला अटक, प्रेयसीसोबत करायचे अश्लील चाळे

45
0

Pratikar News

Aug 17, 2021

By

Nilesh Nagrale

नागपूर : शहराबाहेर रस्त्याच्या कडेला दुचाकीवर एकांतात वेळ घालवत असलेल्या प्रेमी युगुलांना चाकूचा धाक दाखवून लुटमार करणाऱ्या टोळीला कळमना पोलिसांनी (kalamana police nagpur) अटक केली. या टोळीने आतापर्यंत अनेक प्रेमीयुगुलांना लुटले असून बदनामीपोटी तक्रार करण्यात आली नव्हती. मात्र, एका प्रेमी युगुलाच्या तक्रारीनंतर या टोळीला पकडण्यात आले. लक्ष्मण हटिलदास माणिकपुरी (२६, धरमनगर, कळमना) आणि राहुल सुरेश यादव (२८, भगतनगर, कळमना) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत, तर राहुल उईके हा फरार झाला.

crime newsकळमना पोलिसांच्या या पथकाने सदर टोळीस अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कळमना पोलिस ठाण्याच्या हद्दीत अनेक हिरवेगार ‘लव्हर स्पॉट’ आहेत. तसेच शहराच्या बाहेर जाणारे रस्ते असल्यामुळे प्रेमीयुगुलांचे थवे या परिसरात घिरट्या घालत असतात. रस्‍त्याच्या कडेला बाईक उभी करून एकांत शोधतात. जोडप्यांना हेरून त्यांना चाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्या काही तरुणांच्या टोळ्या या भागात सक्रिय आहेत. काही दिवसांपूर्वी जबलपूर रोडवर इंडियन ढाब्याजवळ एक युवक प्रेयसीसह एकांतात बसला होता. दरम्यान, लक्ष्मण हटिलदास माणिकपुरी (२६, धरमनगर, कळमना) आणि राहुल सुरेश यादव (२८, भगतनगर, कळमना) आणि राहुल उईके हे तिघे तेथे आले. त्यांनी प्रेमी युगुलाला मारहाण केली. युवकाच्या गळ्याला चाकू लावला आणि प्रेयसीला पर्समधील पैसे, मोबाईल आणि दागिने काढण्यास सांगितले. तिने नकार दिला असता तिच्या प्रियकराच्या मांडीवर राहुलने चाकू मारला. भळाभळा रक्त निघाल्यामुळे मुलीने सर्व पैसे आणि दागिने दिले तर युवकाचाही मोबाईल आणि पैसे हिसकावले. तसेच तरुण व त्याच्या प्रेयसीला मारहाण केली. त्यानंतर त्यांनी पळ काढला. तो तरुण प्रेयसीसह कळमना ठाण्यात गेला आणि तक्रार केली.

सापळा रचून केली अटक –

ठाणेदार विश्‍वनाथ चव्हाण यांनी लगेच टोळीचा माग घेण्याचे आदेश दिले. पीएसआय अनिल इंगोले यांनी लगेच पथकासह रवाना झाले. विजयनगर बाजार चौकातून राहुल यादव आणि लक्ष्मण माणिकपुरीला अटक केली. त्यानंतर राहुल उईकेला माहिती मिळताच त्याने पळ काढला. दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून प्रेमी युगुलांकडून लुटलेली रक्कम आणि दुचाकी जप्त केली.

तरुणींशी अश्‍लील चाळे –

प्रेमी युगुल एकांतात बसल्याचे हेरून हे अशा टोळ्या लुटमार करण्यासाठी नेहमी जात असतात. टोळीतील गुंड तरुणीच्या इभ्रतीवर प्रियकरासमोरच हात टाकतात. बदनामी टाळण्यासाठी शारीरिक संबंधाची मागणीसुद्धा या टोळ्या करतात. लुटमार केल्यानंतर तरुणीची छेडखानी, अश्‍लील चाळेसुद्धा अशा टोळ्या करतात. ही मुख्य टोळी कळमना पोलिसांनी अटक केल्यामुळे पोलिसांचा वचक निर्माण झाला आहे.

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here