Home सांस्कृतिक स्वच्छता संकल्प देश का, हर रविवार विशेषसा

स्वच्छता संकल्प देश का, हर रविवार विशेषसा

42
0

Pratikar News

चंद्रपूर:-

महानगरपालिका चंद्रपूरतर्फे मागील चार वर्षापासून स्वच्छ भारत अभियानांतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. चंद्रपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून १५ ऑगस्टला काही प्रभागात “ स्वच्छता संकल्प देश का, हर रविवार विशेष सा” यावर प्रत्येक आठवड्यासाठी दिलेल्या थीमवर साप्ताहिक मोहिम आयोजित करून यावर आधारित उपक्रम राबवून मेगा इवेन्ट रविवार साजरा केला.

महाराष्ट्र शहरी विकास मिशन संचालनालय यांच्या पत्रानुसार संपूर्ण देशात “स्वच्छता संकल्प देश का, हर रविवार विशेष सा” ही विशेष मोहीम ऑगस्ट महिन्यातील प्रत्येक रविवारी राबविण्यासंबंधी सूचित केले आहे. या नुसार सामाजिक भवन निर्मल नगर, तुकुम, चंद्रपूर या ठिकाणी “सिंगल यूज प्लास्टिकसे आझादी ” या विषयावर महिलांसाठी उखाणे स्पर्धा आयोजित करण्यात आली. यामध्ये ४५ महिलांनी सक्रीय सहभाग नोंदविला. विषयावर आधारित तीन उत्कृष्ट उखाण्यांची निवड करून सदर महिलांना बक्षीस देण्यात आले. अशा प्रकारे स्पर्धेच्या माध्यमातून स्थानिक लोकांमध्ये प्लास्टिक वापर बंदीबाबत जनजागरण करण्यात आले. त्याचप्रमाणे मित्र नगर चंद्रपूर या ठिकाणी “ प्लॅस्टिक श्रमदान“ या थीमवर आधारित स्थानिक परिसरातील मुलाकडून प्लास्टिक गोळा करण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या. जास्त प्रमाणात प्लास्टिक गोळा करणाऱ्या मुलांना योग्य बक्षिसे देण्यात आली. आपल्या परिसरात जमा होणारा प्लास्टिकचा कचरा आपल्या पर्यावरणासाठी कसा हानिकारक ठरु शकतो, याबद्दल मुलामध्ये जनजागृती करण्यात आली. मुलांनी परिसरात प्लास्टिकचा कचऱ्याची वेळीच विल्हेवाट लावण्याचा संकल्प केला. अशाप्रकारे चंद्रपूर महानगरपालिका चंद्रपूरतर्फे १५ऑगस्ट रोजी “स्वच्छता संकल्प देश का, हर रविवार विशेष सा” या मोहिमेंतर्गत दिलेल्या साप्ताहिक थीमवर प्रभागात कार्यक्रम राबविण्यात आले.

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here