गदचांदुर….
अशोकाकुमार ….
बौद्धांनी
बाबासाहेबांच्या संघटना रूजविण्याचे कार्य केले पाहिजे…
*स्वाभिमानाने व निष्ठेने जगण्यासाठी हरेक गावपातळीवर बाबासाहेबांच्या मूळ तिन्ही संघटनेचे पालेमूळे रुजविणे बाबासाहेबांच्या अनुयायी/ कार्यकर्त्यांचे आद्य कर्तव्य आहे. असे विचार बाबासाहेबांच्या संघटनेचे प्रचारक अशोककुमार उमरे यांनी शेरज खुर्द येथे घेण्यात आलेल्या धम्म जागृती कार्यक्रमात बोलतांनी मांडले.
*दर रविवारी धम्म आपल्या दारी या धम्म जागृतीचा कार्यक्रम आयु. साहेबराव घुग्गूल मु पो शेरज खूर्द त. कोरपना जि चंद्रपूर यांच्या घरी दिनांक १३ ऑक्टोबर घेण्यात आला.*
*सदर कार्यक्रमात-*
*☸ प्रत्येक बौद्धांच्या घरी बाबासाहेबांनी लिहीलेल्या बौद्ध पुजापाठ पुस्तकाचे बौद्ध पुजापाठ नियमित पठन घरोघरी धम्ममय वातावरण निर्माण करणे ☸ येणार्या जनगणनेत धर्माच्या रकान्यात बौद्ध म्हणून नोंद करणे, ☸ बाबासाहेबांनी बौद्धधम्म दीक्षा देतांना दिलेल्या बावीस प्रतिज्ञा कठोरतेने पालन करण्यासाठी प्रत्येक धम्म जागृती कार्यक्रमांत उपस्थितांना अनिवार्यपणे बावीस प्रतिज्ञा पाळण्याचा संकल्प करणे. ☸ बाबासाहेबांच्या १) समता सैनिक दल, २) दी बुध्दीस्ट सोसायटी ऑफ इंडिया व ३)रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या संघटनेची धेय्य, उद्दीष्टांवर व कृती कार्यक्रम करणे. ☸ दर रविवारी बुध्दविहारात बुध्द वंदनेस जाणे. ☸ दररोज घरी वंदना घेऊन धम्ममय वातावरण निर्माण करणे.*
*इत्यादी विषयांवर बाबासाहेबांच्या संघटनेचे प्रचारक अशोककुमार उमरे यांनी चर्चा व मार्गदर्शन करण्यात आले.*
*कार्यक्रमास संगीता तेजराज बुचूंडे, तारा परमानंद गेडाम, यशोधरा दिपक निमसरकार, दिपक जगन्नाथ निमसरकार, गिरजाबाई बापुराव बुचूंडे, साहेबराव घुग्गूल, लता साहेबराव घुग्गूल, सुयश साहेबराव घुग्गूल, मनिषा चंद्रभान गेडाम इत्यादीनी कार्यक्रमास सहकार्य केले.*
*सरणतयने कार्यक्रमांचा समारोप करण्यात आला.*
संकलन
कार्यक्रम व अधिक माहितीसाठी संपर्क-*
*अशोककुमार उमरे*
*मो. 8698842402*
*खुशाल मेश्राम*मो.7397958748*
प्रतिकार न्यूज
बातम्या जाहिरात करिता
सम्पर्क 7038636121