Home राष्ट्रीय कोलाम विकास फाऊंडेशन* 💐 🇾🇪🇾🇪 *जागर स्वातंत्र्याचा* 🇾🇪🇾🇪 एक गाव… घोडणकप्पी...

कोलाम विकास फाऊंडेशन* 💐 🇾🇪🇾🇪 *जागर स्वातंत्र्याचा* 🇾🇪🇾🇪 एक गाव… घोडणकप्पी जिथे रस्ता नाही, पाणि नाही.

76
0

💐 *कोलाम विकास फाऊंडेशन* 💐
🇾🇪🇾🇪 *जागर स्वातंत्र्याचा* 🇾🇪🇾🇪

एक गाव… घोडणकप्पी
जिथे रस्ता नाही, पाणि नाही.
शाळेत जाणा-या चिमुकल्यांना दररोज डोंगरावरची खडकाळ वाट चढावी लागते.

महिलांना दररोज पिण्याच्या पाण्याची सोय म्हणून गावालगतच्या ओढ्यात खड्डा करून त्यात पाणि झिरपण्याची प्रतिक्षा करावी लागते.

ताटव्यांनी उभारलेल्या झोपड्या अन् सभोवताल डंख मारायसाठी टपलेल्या सापाच्या भितीचे सावट.

प्रश्न हेच आपले जीवन, समस्या हेच आपले नशिब, असे मानून पिढ्या मागून पिढ्या पुढे सरकत आहेत…

रोजगार नाही, जनजाग्रुती नाही…
अधिकारी नाही, पदाधिकारी नाही.

तेच अद्ण्यान, तीच बुवाबाजी…
नेत्यांच्या आश्रीतांसारखे वागणा-या कार्यकर्त्यांचा मात्र बडेजाव…
डिंगा मारणा-या पुढा-यांना त्याचे काहीच सोयर सुतक नाही..

हीच इथली लोकशाही, हेच इथले स्वातंत्र्य !

चला, या उपेक्षीत वस्तीवर तिरंगा फडकवू या !
७४ वर्षात सरकारने दुर्लक्षिलेल्या या वस्तीवर स्वातंत्र्याचे गीत गाऊ या !
थोडेसे श्रमदान करून घोडणकप्पीचा रस्ता निर्माण करू या !

*स्वातंत्र्याच्या कक्षा रूंदावू या !*
*चला, घोडणकप्पीला तिरंगा फडकवू या !!*

विकास कुंभारे
अध्यक्ष, कोलाम विकास फाऊंडेशन.
🇾🇪🇾🇪🇾🇪🇾🇪🇾🇪🇾🇪🇾🇪

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here