Home आपला जिल्हा पशुपालकास वनविभागाकडून 10 हजाराचा धनादेश

पशुपालकास वनविभागाकडून 10 हजाराचा धनादेश

83
0

पशुपालकास वनविभागाकडून 10 हजाराचा धनादेश
राजुरा,प्रतिनिधी
वनसडी वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या कोरपना उपवनक्षेत्रातील मांडवा नियत वनक्षेत्रात टांगाळा येथील पशुपालक लचु कोडापे याची गाय वाघाचे हल्ह्यात ठार झाली होती,माहिती मिळताच वनरक्षक गजानन बोढे यांनी मोका पंचनामा व इतर सोपस्कार करून प्रकरण वरिष्ठ कार्यालयात पाठविले होते,वन विभागाने सदर प्रकरण मंजूर करून नुकसानग्रस्त पशुपालकास 10 हजार रुपयांची आर्थिक मदत मंजूर केले
आज दिनांक 10 आगस्ट रोजी वनपरिक्षेत्र अधिकारी अरुणा चौधरी यांचे हस्ते पशुपालक लचु कोडापे यास 10 हजाराचा धनादेश देण्यात आला याप्रसंगी कोरपना येथील सामाजिक कार्यकर्ते निस्सार शेख,संयुक्त वनव्यवस्थापन समितीचे बाळू टेकाम ,वनरक्षक गजानन बोढे उपस्थित होते.

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here