* स्वतंत्र विदर्भासाठी बेमुदत ठिय्या आंदोलन दडपणा-या सरकारचा निषेध
* राजुरा व कोरपणा येथे तहसीलदारांना निवेदन
राजूरा, तालुका प्रतिनिधी –
स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करावे, कोरोना काळातील वीज बिल सरकारने भरावे, पेट्रोल- डिझेल- गॅस दरवाढ मागे घ्यावी, या प्रमुख मागण्यांसाठी विदर्भ राज्य आंदोलन समिती तर्फे दिनांक 9 ऑगस्ट या क्रांती दिनापासून नागपूर येथील शहीद चौकातील विदर्भ चंडिका मंदिर येथे ठिय्या आंदोलन शांततेने सुरू होते. मात्र पोलिसांनी आंदोलन समितीचे बॅनर फाडून समितीचे अध्यक्ष माजी आमदार अँड. वामनराव चटप आणि या आंदोलनात सहभागी झालेल्या आंदोलकांना अटक केली. याबद्दल चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यात विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडी सरकारचा तीव्र निषेध केला आहे. यासंदर्भात राजुरा व कोरपणा तहसिलदार यांचे मार्फत राज्याचे मुख्यमंत्री नामदार उद्भव ठाकरे यांना पाठविण्यासाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या कार्यकर्त्यांनी निवेदन दिले.
या आंदोलनात विदर्भातील सर्व अकराही जिल्हयातील कार्यकर्ते व नागरिक शांततापूर्वक व लोकशाही मार्गाने ठिय्या आंदोलन करीत होते. मात्र आज दिनांक 10 ऑगस्ट ला दुपारी पोलिसांनी आंदोलनाचे असतांना आंदोलन समितीचे नेते अँड.वामनराव चटप, राम नेवले, महिला आघाडी प्रमुख रंजना मामर्डे, मुकेश मासूरकर या नेत्यांसह अनेक कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली. यावेळी पोलिसांनी आंदोलनाचा बॅनर ही फाडून टाकला. या दडपशाही कृतीचा समितीचे युवा आघाडीचे विदर्भ उपाध्यक्ष कपिल इद्दे, माजी नगराध्यक्ष व विरोधी पक्षनेते रमेश नळे, जिल्हा उपाध्यक्ष मधुकर चिंचोलकर, नगरसेवक भाऊजी कन्नाके, बंडू देठे, पुंडलिक वाढई यांनी निषेध नोंदवित निवेदन राजुरा तहसिलदार यांना दिले. कोरपणा येथे अरुण नवले, बंडू राजुरकर, अँड.श्रीनिवास मुसळे, रमाकांत मालेकर, नगरसेवक सुभाष तुराणकर, अविनाश मुसळे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी कोरपणा तहसीलदार यांना निवेदन दिले.
महाविकास आघाडी सरकारच्या या दडपशाही कृतीचा चंद्रपूर जिल्हाध्यक्ष किशोर दहिकर, किशोर पोतनवार, मनोहर गेडाम, अंकुश वाघमारे, मितीन भागवत, कपिल इद्दे, वैशाली कटलावार, प्रणिता जुनघरे, अनिता डोंगरे, सौ.उराडे, कोअर कमिटी सदस्य अँड.मोरेश्वरराव टेमूर्डे, हिराचंद बोरकुटे, रमेश राजुरकर, पराग गुंडेवार, सुदाम राठोड, योगेश मुरेकर, सुधीर सातपुते, प्रशांत ढवळे, मुन्ना आवळे, श्री.सहारे, जयदेव मून, नरेंद्र बंडे, सुधाकर जिवतोडे, सचिन सरपटवार, नथमल सोनी, अरुण वासलवार, अरविंद चव्हाण, सतीश पवार, विकास बोरकर, गिरीधरसिंह बैस, गोपाळ रायपुरे, कवडू येनप्रेडीवार, नरेंद्र काकडे, रमाकांत मालेकर, अनिल दिकोंडवार, गोपी मित्रा, मधुकर चौधरी, सचिन मेश्राम योगेश नंदनवार, गीता मेश्राम, ईश्वर चहारे, अविनाश उके, प्रदीप सोयाम, सुनील राठोड, विनोद पवार या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी निषेध केला आहे.