Home शैक्षणिक माजी आमदार सुदर्शन निमकर यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थीनीचा सत्कार केतकी ढुमणे...

माजी आमदार सुदर्शन निमकर यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थीनीचा सत्कार केतकी ढुमणे बारावीला तालुक्यातुन प्रथम; विज्ञान शाखेत 97 टक्के गुण

55
0

माजी आमदार सुदर्शन निमकर यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थीनीचा सत्कार

केतकी ढुमणे बारावीला तालुक्यातुन प्रथम; विज्ञान शाखेत 97 टक्के गुण

राजुरा : येथील जीवन विमा निगम चे विकास अधिकारी किरण काशीनाथ ढुमणे यांची कन्या केतकी हिने नुकत्याच मूल्यमापन पद्धतीने जाहीर झालेल्या महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत राजुरा तालुक्यातुन 97% गुण प्राप्त करून प्रथम येण्याचा मान मिळविला त्याबद्दल माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी त्यांच्या घरी जाऊन केतकी चा सत्कार व केतकी सह कुटुंबियांचे अभिनंदन केले.

केतकी हि मागील शैक्षणिक वर्षात शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय राजुरा येथे विज्ञान शाखेला शिक्षण घेत होती, त्याअगोदर दहावीमध्ये सुद्धा तिने चांगले गुण घेत प्राविण्य प्राप्त केले होते त्यानंतर अकरावीत तिच्या मध्ये असलेले शैक्षणिक कौशल्य नेहमी शिक्षकाना प्राविन्य प्राप्त विद्यार्थ्यांमध्ये असलेली चुणूक दाखवित होती. कोविड-१९ मुळे यावर्षी बारावीची परीक्षा न झाल्याने बोर्डाने अंतिम निकाल मूल्यमापन पद्धतीने जाहीर केला यात दहावी, अकरावी व बारावीच्या गुणांचे (अंतर्गत) मूल्यमापन करण्यात आले. यात केतकी किरण ढुमणे ही तालुक्यातुन प्रथम आली असून आपल्या यशाचे श्रेय आई-बाबा व संपूर्ण शिक्षकांना दिले.

याप्रसंगी माजी आमदार सुदर्शन निमकर यांच्यासह आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव अविनाश जाधव, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष केशव ठाकरे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक कोंडलकर, वडील किरण ढुमणे इत्यादी उपस्थित होते. उपस्थितांनी केतकीचे अभिनंदन करून पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here