Home राज्य विराआंस चे नागपूरात ९ आँगस्टपासून ठिय्या आंदोलन * चंद्रपूर जिल्ह्यातून हजार कार्यकर्ते...

विराआंस चे नागपूरात ९ आँगस्टपासून ठिय्या आंदोलन * चंद्रपूर जिल्ह्यातून हजार कार्यकर्ते सहभागी होणार

98
0

* विराआंस चे नागपूरात ९ आँगस्टपासून ठिय्या आंदोलन
* चंद्रपूर जिल्ह्यातून हजार कार्यकर्ते सहभागी होणार
राजुरा, दिनांक 8 ऑगस्ट –
स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी निर्माण करावे, कोरोना काळातील वीज बील राज्य सरकारने भरावे, पेट्रोल – डिझेल – गँस दरवाढ त्वरीत मागे घ्यावी या प्रमुख मागण्यांसाठी विदर्भ राज्य आंदोलन समिती तर्फे दिनांक 8 आँगस्ट, रोज सोमवारला क्रांती दिनापासुन विदर्भ स्तरीय ” बेमुदत ठिय्या आंदोलन ” शहीद चौक, इतवारी नागपूर येथे सुरू होत आहे. संपुर्ण विदर्भातून व नागपूर शहरातून हजारोंच्या संख्येने या आंदोलनात सामील होणार आहेत. या आंदोलनात चंद्रपूर जिल्ह्यातून एक हजार विदर्भवादी कार्यकर्ते सहभागी होणार आहेत, अशी माहिती विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अध्यक्ष अँड.वामनराव चटप यांनी दिली आहे.
नागपूर येथे दिनांक 9 ऑगस्ट ला दुपारी १२-०० वाजता विदर्भ चंडिका मातेची महाआरती करून विदर्भ स्तरीय ठिय्या आंदोलनाला सुरुवात होणार आहे. स्वतंत्र विदर्भ झाला तरच येथील लोकांचा विकास होऊ शकतो, बेरोजगारांना नोकरी मिळू शकते, शेतकरी, कष्टकरी, व्यावसायिक यांना न्याय मिळू शकतो याविषयी आता जनतेला विश्वास वाटत आहे. त्यामुळेच तरुण, विद्यार्थी, महिला, नागरिक, नोकरवर्ग, व्यापारी, शेतकरी या सर्वांचा या आंदोलनाला पाठिंबा मिळत आहे. या आंदोलनात विदर्भातील सर्व जिल्ह्यातून नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत.
या विदर्भाच्या लोकांच्या हक्क आणि न्यायासाठी होणार्‍या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन विदर्भ राज्य आंदोलन समितीचे नेते माजी आमदार अँड.वामनराव चटप, जिल्हाध्यक्ष किशोर दहिकर, किशोर पोतनवार, मनोहर गेडाम, अंकुश वाघमारे, मितीन भागवत, कपिल इद्दे, वैशाली कटलावार, प्रणिता जुनघरे, अनिता डोंगरे, सौ.उराडे, कोअर कमिटी सदस्य अँड.मोरेश्वरराव टेमूर्डे, हिराचंद बोरकुटे, रमेश राजुरकर, पराग गुंडेवार, सुदाम राठोड, योगेश मुरेकर, सुधीर सातपुते, प्रशांत ढवळे, मुन्ना आवळे, श्री.सहारे, जयदेव मून, नरेंद्र बंडे, सुधाकर जिवतोडे, सचिन सरपटवार, नथमल सोनी, अरुण वासलवार, अरविंद चव्हाण, सतीश पवार, विकास बोरकर, गिरीधरसिंह बैस, गोपाळ रायपुरे, कवडू येनप्रेडीवार, नरेंद्र काकडे, रमाकांत मालेकर, अनिल दिकोंडवार, गोपी मित्रा, मधुकर चौधरी, सचिन मेश्राम योगेश नंदनवार, गीता मेश्राम, ईश्वर चहारे, अविनाश उके, प्रदीप सोयाम, सुनील राठोड, विनोद पवार या चंद्रपूर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here