Home राजकारण आशा वर्कर वरील हल्ल्याची उच्च स्तरीय चौकशी करून कारवाई करा –...

आशा वर्कर वरील हल्ल्याची उच्च स्तरीय चौकशी करून कारवाई करा – आयटक

44
0
 • * आशा वर्कर वरील हल्ल्याची चौकशी करून आरोपीवर कठोर कारवाई करा

  * जिल्हाधिकारी व पोलिस अधिक्षक कार्यालयापुढे आयटक चे निदर्शन

  चंद्रपूर.
  चंद्रपूर जिल्हयातील राजुरा तालुक्यातील नोकारी खुर्द येथील संगीता जयप्रकाश ठाकरे या आशा वर्कर ला दिनांक 6 ऑगस्ट 2021 ला गावात ताप सर्वेक्षण व कोविड लसीकरण बाबत माहिती देत होत्या. यावेळी गावातील सचिन किसन विच्यू या व्यक्तीने आशा वर्कर संगीता ठाकरे हिला अर्वाच शिवीगाळ करीत तिचा गळा दाबून मारहाण केली. अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी आरडाओरड करीत मध्यस्थी केल्याने ती थोडक्यात बचावली. या जीवघेण्या हमल्याची उच्च स्तरीय चौकशी करून आरोपीवर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी दिनांक 7 ऑगस्ट ला आयटक चे राज्य सचिव कॉ. विनोद झोडगे यांच्या नेतृत्वात शेकडो आशा व गट प्रवर्तक महिला जिल्हाधिकारी कार्यालय व पोलिस अधीक्षक कार्यालय समोर तीव्र निदर्शने करून सदर घटनेचा निषेध केला व आरोपीवर तातडीने गुन्हा नोंद करून कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीचे निवेदन पोलिस अधीक्षक यांना देण्यात दिले.
  यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी शेखर देशमुख यांनी निवेदन स्वीकारून आंदोलक यांच्या समोर येऊन आरोपीवर तातडीने कठोर कारवाई करणार असल्याचे सांगितले. या हल्ल्यामुळे जिल्हयातील आशा वर्कर, गट प्रवर्तक यांच्या मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेचा आयटक महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा व गट प्रवर्तक संघटने तर्फे जाहीर निषेध करण्यात आला. करणाऱ्या आरोपीवर कठोर शिक्षा पोलिसांनी करावी, आरोग्य विभागाने देवाडा प्राथमिक आरोग्य अधिकारी, आरोग्य उपकेंद्र मानोली यांनी सुद्धा गडचांदूर पोलिस स्टेशन मध्ये कलम 353 अन्वये शासकीय कामात अडथळा केल्याबद्दल गुन्हा दाखल करावा, अशी मागणी संघटनेने केली आहे.
  या घटनेचा निषेध करण्यासाठी जिल्हयातील अनेक तालुक्यात आशा वर्कर व गट प्रवर्तक महिलांनी निवेदन दिले. सदर घटनेची रीतसर तक्रार गडचंदुर पोलिस स्टेशनला दिली आहे. आरोपीवर योग्य ती कारवाई झाली नाही तर जिल्ह्यातील सर्व कोरोना योद्धा ,आशा व गट प्रवर्तक महिला कोरोना काळात आरोग्याचे सर्वच कामावर बहिष्कार टाकण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष कॉ. विनोद झोडगे, राजुरा तालुका अध्यक्ष कॉ.शालू लांडे, निकिता नीर, चंद्रपूर शहर सचिव प्रतिमा कायरकर, सविता गटलेवार, सोनाली हजारे, सुकेषणी शंभरकर, प्रेमिला बावणे यांच्यासह आशा वर्कर व गट प्रवर्तक महिलांनी दिला आहे.

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here