Home क्राइम पेपर मिल परिसरात अज्ञात प्रेत आढळले घातपात की आत्महत्या

पेपर मिल परिसरात अज्ञात प्रेत आढळले घातपात की आत्महत्या

26
0

Pratikar News

बल्लारपूर प्रतिनिधी : दिनांक 0 6:- 8.2021 रोजी दुपारी 12. . 2. दरम्यान पेपरमिल परिसरात अज्ञात प्रेत आढळले. नेमके हे प्रेत कुणाचे आहेत. याबाबत अजून ओळख पटली नाही. स्थानिक पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार पेपरमिल संपवले आणि ऐतिहासिक किल्ला परिसरात काही कुख्यात गुंडाकडून मागील काही दिवसांपासून शस्त्र लापविण्याच्या तक्रारी येत होत्या. त्यातच आज संपवले परिसरात अज्ञात प्रेत आढळून आले आहेत. त्यामुळे हा घातपात तर नाही ना? असा संशय स्थानिक नागरिकांकडून व्यक्त केला जात आहेत. त्यामुळे स्थानिक पोलीस प्रशासनाने नागरिकांच्या या सुचनांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी आता स्थानिक नागरिकांकडून व्यक्त केली जात आहेत.

पेपरमिल परिसरातील संपवले परिसरात मोठ्या प्रमाणात अलीकडे झाडे झुडपे वाढलेली आहेत. स्थानिक काही गुंड याच झुडपंचा आश्रय घेऊन गांजा, दारू आणि ईतर मादक पदार्थांचे सेवन करून दिवसभर शहरात उद्रेक करण्याचा प्रयत्न करीत आहेत. याचा प्रत्यक्ष त्रास स्थानिक नागरिकांना होत असून, यावर कायमस्वरूपी तोडगा काढवा असे मत स्थानिक नागरिकांच्या वतीने वर्तविले जात आहेत.

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here