Home Breaking News बसच्या चाकात आल्याने राहुल रेकलवार युवकाचा दुर्दैवी मृत्यू

बसच्या चाकात आल्याने राहुल रेकलवार युवकाचा दुर्दैवी मृत्यू

132
0

* बसच्या चाकात आल्याने युवकाचा दुर्दैवी मृत्यू
राजुरा, तालुका प्रतिनिधी –
शहरातील अत्यंत रहदारीच्या आसिफाबाद मार्गावर बँक ऑफ इंडिया समोर बसच्या चाकेत आल्याने एका ३२ वर्षीय तरुणाचा दुःखद मृत्यू झाला.
प्राप्त माहितीनुसार आज दुपारी दोन वाजताच्या दरम्यान दुचाकीवर दोन मित्र बँक ऑफ इंडिया समोरून जात असतांना अचानक दुचाकीवरून पडले. गाडी चालवणारा रस्त्याचा साईडच्या बाजूला तर मागे बसलेला मृतक राहुल लक्ष्मीनारायण रेकलवार, वय ३२ हा रस्त्याकडे पडला. त्याच वेळी बस स्टॅन्ड कडे जाणारी बस क्रं. एमएच १३ सीव्ही ६३३८ मागून येत होती. या बसच्या मागील चाकेत आल्याने राहुल रेकलवार याचा दुर्दैवी अंत झाला. मागच्या चाकात आल्याने बस चालकाला या दुर्घटनेची कल्पना नव्हती व बस समोर निघून गेली. उपस्थित लोकांनी राहुलला उपजिल्हा रुग्णालयात नेले असता डॉक्टरानी त्याला मृत घोषित केले. पोलिसांनी बस चालक निलेश राजू झाडे रा. चुनाळा याला ताब्यात घेतले आहे. घटनेच्या अधिक तपास पोलीस निरीक्षक चंद्रशेखर बहादुरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस करीत आहेत.

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here