* एक्सलन्स अवॉर्ड विजेते डॉ. संजय गोरे यांचा अँड.वामनराव चटप यांनी केला सत्कार
राजुरा, तालुका प्रतिनिधी –
नॅशनल हेल्थ सर्विस इंग्लंड द्वारे आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये शरद पवार महाविद्यालयाचे विभाग प्रमुख प्रा. डॉ. संजय गोरे यांना आतंरराष्ट्रीय रिसर्च एक्सलन्स अवार्ड आणि बेस्ट टीचर ऑफ द ईयर अवार्ड हे दोन पुरस्कार मिळाले आहेत. त्यांच्या या सन्मानाबद्दल शेतकरी संघटनेचे जेष्ठ नेते, माजी आमदार अँड. वामनराव चटप यांनी त्यांचे निवासस्थानी जाऊन शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला. यावेळी गोरे यांच्या शैक्षणिक कार्याबद्दल अँड.चटप यांनी गौरवोद्गार काढले. यावेळी नगरसेवक दिलीप देरकर, मधुकर चिंचोलकर, दिलीप देठे, डॉ.अमृत गोरे, ज्ञानेश्वर माकोडे, घनश्याम हिंगाणे उपस्थित होते
डॉ. संजय गोरे हे पीएचडी पदवीचे मार्गदर्शक असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली आठ विद्यार्थ्यांना आचार्य पदवी प्राप्त झालेली आहे. त्यांचे आजपावेतो 6 क्रमिक आणि संदर्भ ग्रंथ, तौलनिक शासन आणि राजनीती, तुलनात्मक शासन आणि राजकारण, भारतीय लोकशाही, पंचायतराज आणि आदिवासी नेतृत्व, महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज संस्था, चंद्रपूर जिल्हयातील आदिवासी नेतृत्व ही पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. यापूर्वी राजुरा भूषण सन्मान प्रदान करून त्यांचा गौरव झाला होता.