Pratikar News
260 ब्रास रेती अवैधपणे आकाश सोनटक्के यांनी केली होती साठवणूक.
चंद्रपूर प्रतिनिधी:-
शहरातील बिनबा गेट परिसरात असलेल्या आकाश सोनटक्के यांच्या आकाश बिल्डिंग मटेरियल सप्लायर च्या परिसरातून जवळपास 260 ब्रॉस रेती नायब तहसीलदार गादेवार यांनी दिनांक 2 ऑगस्ट ला सकाळी 11.50 वाजता च्या दरम्यान जप्त केली होती, पावसाळ्यात रेती चा काळा बाजार करून जास्त दरात रेतीची विक्री करण्यासाठी साठवून ठेवलेल्या या रेतीच्या साठ्यांची जप्ती तहसीलदार गोड यांच्या मार्गदर्शनात नायब तहसीलदार जितेंद्र गादेवार यांनी केल्याने शहरात खळबळ उडाली होती.
दरम्यान बिनबा गेट परिसरातील आकाश सोनटक्के नामक बिल्डिंग मटेरियल सप्लायर परिसरातून जप्त केलेल्या रेतीचा साठा मोजण्यात आला होता पण दुसऱ्याच दिवशी म्हणजे दिनांक 3 ऑगस्ट ला रात्री 11.30 वाजता बिनबा गेट पतीसरात तीन ते चार लोकांच्या समक्ष एक जेसीबी मशीन आली आणि जप्त रेती मधील रेती हायवा मधे भरून तो हायवा आणि ती जेसीबी बाहेर गेली या संदर्भात त्या ठिकाणचे पुरावे मिळणार असून तहसीलदार गादेवार यांनी जप्त केलेल्या रेतीची चोरी चक्क आकाश सोनटक्के यांच्या माध्यमातून झाल्याने आता तहसीलदार काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.