Home Breaking News तुलाना तलावात बुडून शेतकर्‍याचा मृत्यू * बैलांना पाणी पाजताना झाली दुर्घटना

तुलाना तलावात बुडून शेतकर्‍याचा मृत्यू * बैलांना पाणी पाजताना झाली दुर्घटना

190
0

* तुलाना तलावात बुडून शेतकर्‍याचा मृत्यू
* बैलांना पाणी पाजताना झाली दुर्घटना
राजुरा, तालुका प्रतिनिधी –
राजुरा तालुक्यातील तुलाना तलावात आज दिनांक 5 ऑगस्टला तुलाना गावातील शेतकरी बाबुराव तुकाराम राऊत, वय 70 या शेतकर्‍याचा बुडून मृत्यू झाला. आज दुपारी अडीच वाजता ही दुर्दैवी घटना घडली.
बाबुराव राऊत या शेतकऱ्याचे शेत तुलाना तलावाचे जवळ आहे. दुपारी अडीच वाजता हा शेतकरी आपल्या बैलांना पाणी पाजण्यासाठी तुलाना तलावाचे काठावर आला. यावेळी बैल पाणी पीत असतांना अचानक हा शेतकरी पाय घसरून तलावात पडला आणि खोल पाण्यात जाऊन बुडून गेला. शेजारी शेतात फवारणी करणारे खुशाल राऊत यांना बाबुराव पाण्यात पडल्याचे दिसताच धावून आले. मात्र तोपर्यंत बाबुराव दिसेनासे झाले होते. त्यांनी ताबडतोब गावकऱ्यांना माहिती दिली. परंतु खोल पाण्यात बुडाल्याने बाबुरावाचा पत्ता लागला नाही. अखेर या प्रकरणी प्रेमसागर राऊत यांनी विरूर स्टेशन पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अखेर शोधल्यानंतर प्रेत सापडले आहे. विरूर स्टेशन पोलीस अधिक तपास करीत आहेत. मृत शेतकऱ्याचे मागे पत्नी, दोन मुले व एक विवाहित मुलगी आहे.

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here