Home Breaking News धक्कादायक पॅथॉलॉजी लॅब मधून रुग्णाची एकाच दिवशी रक्तचाचणीची वेगळी रिपोर्ट

धक्कादायक पॅथॉलॉजी लॅब मधून रुग्णाची एकाच दिवशी रक्तचाचणीची वेगळी रिपोर्ट

74
0

Pratikar News

कोरपना ता.प्र.:-
डिजिटल इंडियाच्या धर्तीवर हल्ली सर्व व्यवहार आनलाईन पद्धतीने सुरळीतपणे सुरू आहे.असे असताना सदर पद्धत ही एखाद्याच्या जीवावर बेतणे म्हणजे धक्कादायकच म्हणावी लागेल. असाच एक गंभीर आणि जीवघेणा प्रकार नुकताच गडचांदूर येथे समोर आला आहे. येथील पोस्ट ऑफिस जवळील “श्री मायक्रोबॉयलॉजी & पॅथॉलॉजी लॅब (एसएमपीएल)कडून एका व्यक्तीला त्याच्या लहान मुलाच्या रक्ताची रिपोर्ट चुकीची देण्यात आल्याचा प्रकार घडल्याने मुलाच्या पालकांना मोठ्याप्रमाणात आर्थिक,शारिरीक व मानसिक नुकसान व मनस्ताप देणारा ठरला आहे.सदर लॅब एक्स्टेंशन काऊंटर म्हणून चालवल्या जात असून रुग्ण गडचांदूरात,डॉक्टर बसले चंद्रपूरात अशी परिस्थिती पहायला मिळत आहे.याठिकाणी डॉक्टर उपस्थीत नसल्याने बिना अनुभवी मुलामुलींच्या जीवावर ही लॅब सुरू आहे.
सविस्तर असे की,गडचांदूर येथील प्रतिष्ठित नागरिक,समाजसेवक उद्धव पुरी यांच्या मुलाचा ताप कमीजास्त होत असल्याने हे डेंग्यू,मलेरियाचे लक्षण तर नाही ना ! या शंकेचे निराकरण करण्यासाठी २ आगस्ट रोजी यांनी येथील डॉ.ओमप्रकाश बोबडे यांच्या “एसएमपीएल” या लॅब मध्ये मुलाच्या रक्ताची तपासणी असता धक्कादायक प्रकार सामोर आला.विशेष बाब म्हणजे डॉक्टर बोबडे हे याठिकाणच्या लॅब मध्ये उपस्थीत राहत नसून त्यांच्या अनुपस्थितीत बिना अनुभवी युवक,विद्यार्थी रुग्णांच्या रक्ताची तपासणी केली जात आहे. आनलाईन चंद्रपूरला पाठवण्यात येते आणि डॉक्टर रिपोर्ट देत आहे.याच पार्श्वभूमीवर उद्धव पुरी यांच्या मुलाचा रिपोर्ट चुकीचा दिल्याने यांना धक्काच बसला.प्लेटलेट्स काउंट चक्क ४९०००, हिमोग्लोबिन ४.२ असे दाखवल्याने घाबरून लगेच यांनी मुलाला चंद्रपूर येथे एका डॉक्टर कडे नेले आणि अदाजे ५ तासाच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर नंबर लागला आणि तपासणी केली तर रिपोर्ट पाहून अचंबीत झाले व त्या रिपोर्टबद्दल शंका व्यक्त केली.पुन्हा डबल रक्त तपासायला लावले तर प्लेटलेस्ट १८८००० व हिमोग्लोबीन १४.२ आढळून आले.तेंव्हा यांनी सुटकेचा निःश्वास सोडला.ही प्रक्रिया करून हे रात्री उशीरा घरी परतले.हे सर्व त्या चुकीच्या रिपोर्ट मुळे घडले असून विनाकारण यांना आर्थिक,मानसिक व शारिरीक त्रास सहन करावा लागला.या धावपळीत फुकटचा मनस्ताप व जवळपास १० हजाराचे नुकसान झाले असून याची तक्रार जिल्हाधिकारी यांच्याकडे करणार असल्याची माहिती देण्यात
आली आहे. एक्सटेंशन काउंटर चालवायचे असेल तर याठिकाणी डॉक्टरांनी स्वतः उपस्थित राहण्याची आवश्यकता असून अन्यथा सदर तपासणी केंद्र बंद करण्यात यावे, यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आहे.तसेच माझ्या सोबत जे घडले ते प्रकार इतरांसोबत घडु नये यासाठी सर्वांनी सावधानता बाळगावी, योग्य डॉक्टरांकडे उपचार घ्यावा जेणेकरून भविष्यात काही विपरीत घडणार नाही असे आवाहन नागरिकांना करत रुग्णांच्या आरोग्याशी हा जीवघेणा खेळ असून पैसा कमवण्यासाठी थाटलेले हे एक दुकान असल्याचा आरोप पुरी यांनी केला आहे.

याप्रकरणी प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी सदर प्रतिनिधींनी चंद्रपूर येथे डॉ.बोबडे यांना दूरध्वनीवरून संपर्क केला असता संपर्क झालेला नाही.काही का असेना मात्र सदर डॉक्टर बंधू डिजिटल पद्धतीचा सोईस्करपणे वापर करून आदिवासी विभागात धन गोळा करीत असल्याची उपहासात्मक चर्चा सध्या शहरात सुरू आहे.

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here