Home Breaking News प्रभाग समितीसाठी एकूण ४ नामनिर्देशन पत्र दाखल मनपाच्या झोन सभापतीपदासाठी गुरुवारी...

प्रभाग समितीसाठी एकूण ४ नामनिर्देशन पत्र दाखल मनपाच्या झोन सभापतीपदासाठी गुरुवारी विशेष सभा

39
0

Pratikar News

चंद्रपूर, ता. ४ : चंद्रपूर शहर महानगरपालिका, चंद्रपूरच्या प्रभाग समिती क्रमांक एक, दोन आणि तीनच्या सभापतिपदाच्या निवडीसाठी गुरुवार ता. ५ ऑगस्ट रोजी मनपाच्या नवीन प्रशासकीय इमारतीतील राणी हिराई सभागृहात पीठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा होत आहे. दरम्यान, आज तिन्ही प्रभागासाठी ४ नामनिर्देशन पत्रे दाखल झाली.

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम २९ अ-(४) अन्वये विभागीय आयुक्त, नागपूर विभाग नागपूरचे पत्र क्रमांक एमयुएन/१९/ (२) कावि- २०५/२०२१ दि. २६ जुलै २०२१ व पत्र क्रमांक एमयुएन/१९/(२) कावि- २०१६/ २०२१ दि. २ ऑगस्ट २०२१ अन्वये २०२१-२२ साठी चंद्रपूर शहर महानगरपालिका, चंद्रपूरच्या प्रभाग समिती क्रमांक एक, दोन आणि तीन मधील सदस्यांतून प्रभाग समिती सभापती यांची निवड करण्यासाठी कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची ता. ४ ऑगस्ट रोजी सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत शेवटची मुदत होती. नगर सचिव यांच्या कार्यालयात एकूण ४ उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले. प्रभाग समिती एकमधून भारतीय जनता पक्षाच्या छबूताई मनोज वैरागडे, प्रभाग समिती दोनमधून भारतीय जनता पक्षाच्या खुशबू अंकुश चौधरी, प्रभाग समिती तीनमधून भारतीय जनता पक्षाचे सोपान गेनभाऊ वायकर व भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अली अहमद मन्सूर आदींनी नामांकन दाखल केले आहे.

प्रभाग समिती सभापती यांची निवड करण्यासाठी विशेष सभा ता. ५ ऑगस्ट रोजी पीठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे. प्रभाग समिती एकसाठी सकाळी ११ वाजता, प्रभाग समिती दोनसाठी दुपारी १२ वाजता, प्रभाग समिती तीनसाठी दुपारी १ वाजता सभा होईल. पाच ऑगस्ट रोजी विशेष सभा सुरु झाल्यावर नामनिर्देशन पत्राची छानणी होईल. छाननीनंतर १५ मिनिटाच्या कालावधीत नामनिर्देशन पत्र मागे घेता येईल. त्यानंतर त्याच दिवशी आवश्यकता भासल्यास सर्व नगरसेवकांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत मतदान होईल, अशी माहिती चंद्रपूर शहर महानगरपालिका, चंद्रपूरच्या नगर सचिवांनी दिली आहे.

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here