Home Breaking News Today 04 AUGUST : चंद्रपुर जिल्हा कोरोना अपडेट ✳️...

Today 04 AUGUST : चंद्रपुर जिल्हा कोरोना अपडेट ✳️ 06 कोरोना वर मात ✳️ 15 नविन पॉझिटिव्ह ✳️ 00 बाधितन्चा कोरोना ने मृत्यू

230
0
Pratikar News 
 Nilesh Nagrale
चंद्रपूर, दि. 4 ऑगस्ट: गत 24 तासात जिल्ह्यात 6  जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तसेच 15 जण नव्याने पॉझिटीव्ह आले आहेत. जिल्हयात बुधवारी एकाही बाधिताचा मृत्यू झाला नाही.
आरोग्य विभागाच्या प्राप्त अहवालानुसार, बाधित आलेल्या 15 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रातील 10, चंद्रपूर तालुका 0, बल्लारपूर 0, भद्रावती 1, ब्रम्हपुरी 0, नागभीड 0, सिंदेवाही 0, मुल 1, सावली 0, पोंभूर्णा 1, गोंडपिपरी 1, राजूरा 0, चिमूर 0, वरोरा 1, कोरपना 0, जिवती 0 व इतर ठिकाणच्या 0 रुग्णांचा समावेश आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 88 हजार 508 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 86 हजार 901 झाली आहे. सध्या 73 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 6 लाख 24 हजार 922 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 5 लाख 34 हजार 996 नमुने निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 1534 बाधितांचे मृत्यू झाले आहे.
कोविड काळात जिल्ह्यातील बाधित नागरिकांची नोंद ही बाहेर राज्यात तसेच बाहेर जिल्ह्यात करण्यात आली. परंतु सदर नागरिकांची नोंदणी ही संबधीत राज्याने व जिल्हयाने चंद्रपूर जिल्ह्याच्याच पोर्टलवर त्यांच्या आकडेवारीसह दर्शवण्यात आल्याने 3458 कोरोना बाधीत तसेच कोरोना मुक्त रुग्णांचा समावेश पोर्टलप्रमाणे करण्यात येत आहे, असे आरोग्य विभागाने कळवले आहे.
प्रशासनाचे आवाहन : नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच पात्र सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here