Home आपला जिल्हा तहसिलदार बेडसे पाटलाचा प्रताप मानीकगड जमीनीचा आक्षेप असताना अल्ट्राटेकच्या नावाने फेरफार नियमबाहय?

तहसिलदार बेडसे पाटलाचा प्रताप मानीकगड जमीनीचा आक्षेप असताना अल्ट्राटेकच्या नावाने फेरफार नियमबाहय?

111
0

तहसिलदार बेडसे पाटलाचा प्रताप मानीकगड जमीनीचा आक्षेप असताना अल्ट्राटेकच्या नावाने फेरफार नियमबाहय? जिवती बातमीदार. चंद्रपूर जिल्ह्यातील अतिदुर्गम आदिवासी भागातील मोजा कुसुंबी येथील 28 आदिवासी कोलाम कुटुंबाची ६३.६२ हे.आर जमीन महाराष्ट्र शासनाने दिनांक 17 8 1981 ला चुनखडी खनिज लीज करार केला ही जमीन अभिलेखा प्रमाणे खाजगी आदिवासी कुटुंबाची समाविष्ट करण्यात आली महसुली अभिलेख नोंदीनुसार सातबारा मध्ये फक्त चार हेक्टर 16 आर जमीन वन विभागाच्या मालकीची असताना 580 हेक्टर जमीन वन विभागाच्या मालकीची महसुली अभिलेखात नोंदी नसताना तत्कालीन उपवन रक्षकांनी कच्च्या कागदावर ताबा दिल्याचे नोंदी आहेत वन पर्यावरण कायदा 1980 नुसार बांधकामाच्या चुनखडी उत्खननाच्या वन संपत्ती नष्ट करण्याच्या मंजुरी संशयास्पद असून वनपरिक्षेत्रातील 259 हेक्टर जमीन वन साडी वनपरिक्षेत्र तर 223 हेक्टर जिवती वनपरिक्षेत्रातील अशी एकूण 493 एकर जमीन उद्योग विभागाच्या 30 4 1979 या पत्रानुसार नोंदी दिसून येतात तसेच यापैकी 150 हेक्टर जमीन वन विभागाला परत दिल्याचे 9 2 2019 च्या वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या पत्रात नमूद आहे उपविभाग प्रांत अधिकारी यांच्या आदेशानुसार जीपीएस द्वारे मोजणी करून पालीगॉन नकाशाप्रमाणे आदिवासी कोलाम यांच्या जमिनी भू पुष्ट अधिकार व भूसंपादन न करता उत्खनन केल्याचा अहवाल देण्यात आला अनेक आदिवासी कुटुंब उघड्यावर पडल्याच्या शोषण झाल्याच्या तक्रारी पोलीस विभागाला देण्यात आल्या मात्र पोलीस आणि महसूल विभागाच्या टोलवाटोलवी करत खऱ्या योग्य मार्गाने चौकशी व कारवाई न केल्यामुळे आदिवासी यांना अन्यायाचे बळी पडले आहे मात्र विभागाच्या दुर्लक्ष पणामुळे उद्योजक कंपनीला रान मोकळे केल्याने राष्ट्रीय संपत्तीची मोठी हानी व मंजूर शेत्र बाहेर चुनखडी उत्खनन वन संपत्ती ची रास होत असताना प्रशासनाची भूमिका संशयास्पद आहे ज्योती येथील तहसीलदार प्रशांत बेडसे यांनी आपले कर्तव्य जबाबदारी झटकून अनेक वरिष्ठांचे चौकशी संबंधात आलेल्या पत्राची चौकशी न करता गेल्या दोन वर्षात अनेक वर्षापासून कंपनी व आदिवाशाचा सुरू असलेला संघर्ष तक्रारीची चौकशी तत्परतेनं न करता अनेक आदिवाशांची फेरफार घेण्यास आक्षेप असताना मोठ्या तत्परतेने आपल्या अधिकार क्षेत्राच्या बाहेर जाऊन तीन दिवसात माणिकगड सिमेंट च्या सातबारा तत्परतेनं अल्ट्राटेक सिमेंट च्या नावाने फेरफार घेण्यामध्ये मंडळ अधिकारी व तलाठी यांची दमदाटी करून फेरफार घेण्यामध्ये एवढी घाई करण्यामागील कारणाची चौकशी होणे अत्यंत आवश्यक आहे आक्षेप असताना व कंपनी कायद्याअंतर्गत फेरबदल दुरुस्तीबद्दल मागणी व शासकीय वरिष्ठ कार्यालयाचे आदेश नसताना तहसीलदारांनी ही तत्परता दाखविली आपल्या कार्यकाळात अधिवासाच्या अन्याय-अत्याचाराच्या अनेक तक्रारी चौकशीकरिता तहसिलदाराकडे आले असताना याची चौकशी करून अहवाल न देणाऱ्या व या अन्यायामुळे हतबल होऊन चार आदिवासींना हक्कासाठी आपल्या जीवन यात्रा संपवावी लागली त्यावेळी मात्र या तहसीलदारांनी तत्परता दाखवली असती तर आदिवासी यांना आपल्या जिवाला मुकावे लागण्याची पाळी आली नसती माणिकगड सिमेंट व्यवस्थापनाशी संगनमत व हात मिळवणी करून तीन दिवसात स्वतः आदेश पारित करून फेरफार पंजी वर नोंद घेऊन अति जमिनच कंपनीच्या नावाने करणाऱ्या तहसीलदारांनी यामध्ये भ्रष्ट व आर्थिक महा घोटाळा केल्याचा आरोप सर्वत्र होत असून गेल्या तीन वर्षात वरिष्ठ कार्यालयाच्या पत्राची चौकशी करण्यामध्ये दुर्लक्ष करणाऱ्या वरिष्ठांच्या पत्राला केराची टोपली दाखवणारा दोनशे एकर आदिवासी कोलाम जमिनीचा शेत सारा माणिक गड कंपनीकडून वसूल करणारे अधिकारी अकृषक औद्योगिक शेतसारा अनाधिकृत रस्त्यावरील बांधकाम रस्त्यावरील कब्जा यावर कारवाई न करणारे तहसीलदार बेडसे आक्षेपांची सुनावणी न घेता एक तर फेरफार करण्यामागे अनेकांचे हात ओले झाले असून तहसीलदाराने आपले कर्तव्य व सेवाशर्ती भंग करून आदिवाशांची पिळवणूक करणे याला जबाबदार असल्याने अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करावा आदिवासींच्या तक्रारीची गुन्हे अन्वेषण विभागाकडून संपूर्ण चौकशी करावी अन्यथा येत्या 23 ऑगस्ट रोजी जिवती येथील तहसील कार्यालय पुढे जेलभरो आंदोलन करण्याचा इशारा पत्रकार परिषदेत गोंडवाना गणतंत्र पार्टीचे गजानन जुमनाके जन सत्याग्रह संघटनेचे आबिद अली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक पांडुरंग जाधव राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष कैलास राठोड गोंडवाना गणतंत्र पार्टीचे तालुका अध्यक्ष ममता जाधव नगरसेवक अमर राठोड जिल्हाध्यक्ष बाबुराव मडावी प्रदेश अल्पसंख्याक अध्यक्ष जमीर पटेल शंभू आत्राम हिरामण उद्दे लिंगू आत्राम भाऊराव कन्नाके यांनी दिला असून आदिवाशाचे अन्याय सहन केले जाणार नाही प्रशासनाने तातडीने दखल घेऊन आदिवासा ला न्याय द्यावा अन्यथा खदानी बंद पाडू असा इशारा गोंडवाना गणतंत्र पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांनी दिला असून आंदोलन आक्रमक पवित्र्यात असल्याची चर्चा घोंगावत आहे.

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here