Home Breaking News -अखेर पोलीस कर्मचारी राजेश मोगरेवर बलात्काराचा गुन्हा दाखल?* सहआरोपी म्हणून...

-अखेर पोलीस कर्मचारी राजेश मोगरेवर बलात्काराचा गुन्हा दाखल?* सहआरोपी म्हणून एका महिलेला पण पोलीसांनी केली अटक. शहरात सेक्स रॉकेटचा होणार पर्दाफाश?*

47
0

Pratikar News

2 August 2021

एका विवाहित महिलेवर पोलीस कर्मचारी राजेश मोगरे हा जोरजबरदस्तीने चाकूचा धाक दाखवून व तुझी बदनामी करतो म्हणून वारंवार बलात्कार करायचा व तिला कुठे वाच्यता केलीस तर जीवे मारण्याची धमकी द्यायचा.अशातच तिने शारीरिक सबंध ठेवायला नकार दिल्यानंतर तिची सामाजिक माध्यमावर पोस्ट टाकून बदनामी तो करीत होता, दरम्यान ती महिला आपल्या पतीपासून वेगळी राहत होती कारण त्याने अगोदरच पाहिले लग्न केले होते व तिच्या सोबत तो राहत होता या संधीचा फायदा घेऊन पोलीस कर्मचारी राजेश मोगरे यांनी तिच्या नवऱ्याला माझे तुझ्या बायकोशी अनैतिक सबंध असल्याचे सांगितले त्यामुळे त्या पीडित महिलेच्या पतीने त्या पीडित महिलेला बेदम मारहाण केली या संबंधात अगोदरच पिडितेचा पती व पोलीस कर्मचारी राजेश मोगरे यांच्या विरोधात पिडितेने तक्रार केल्यावरून कलम 324 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. पण रामनगर पोलीस स्टेशन मधे पोलीस कर्मचारी राजेश मोगरे विरोधात पिडितेने तक्रार दिल्यानंतर सुद्धा कारवाई झाली नाही त्यामुळे पिडितेच्या तक्रारी वरून ही बातमी  न्यूज वर पोलीस प्रशासन जागं झालं व राजेश मोगरे आणि त्यांच्या सोबत यामधे सामील असलेल्या वंदना गवळी यांना सुद्धा अटक करण्यात आली.

सामाजिक कार्यकर्त्या सरिता मालू यांनी केली पीडित महिलेला मदत.

पिडितेने वारंवार आरोपीपासून दूर जाण्याचा प्रयत्न केला पण तरीही राजेश मोगरे यांनी पीडित महिलेला त्रास देणे बंद केले नाही पर्यायाने त्या पीडित महिलेने रामनगर पोलीस स्टेशन मधे सामाजिक कार्यकर्ता सरिता मालू यांच्या मदतीने तक्रार दिल्याने पोलीस कर्मचारी राजेश मोगरे यांच्या विरोधात कलम 376(2)(n),109,323,506 अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांना दोन दिवसाची पोलीस कस्टडी मिळाल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान पोलिसांनी आरोपी राजेश मोगरे यांच्या घरून एक चाकू जप्त केला असून आणखी काही पुरावे मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

शहरात मोठे सेक्स रॉकेट येणार समोर.

या प्रकरणात सह आरोपी असलेली महिला ही सेक्स रॉकेट चालवीत असल्याची खुद्द पीडित महिलेने पत्रकारांना दिलेल्या आपल्या आपबीती बयानात म्हटले असल्याने पोलीस कर्मचारी राजेश मोगरे यांच्या सहकार्यातून शहरात सेक्स रॉकेट चालत होते याचे संकेत मिळत आहे अर्थात या प्रकरणाच्या मुळाशी जर पोलीस तपास गेला तर शहरातील मोठे सेक्स रॉकेटचा पर्दाफाश होऊ शकतो.

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here