Home आपला जिल्हा जनतेच्या मनात अधिराज्य गाजवणारा लोकनेता आ.सुधीर मुनगंटीवार — मा.आमदार अँड संजय धोटे*

जनतेच्या मनात अधिराज्य गाजवणारा लोकनेता आ.सुधीर मुनगंटीवार — मा.आमदार अँड संजय धोटे*

37
0

*जनतेच्या मनात अधिराज्य गाजवणारा लोकनेता आ.सुधीर मुनगंटीवार — मा.आमदार अँड संजय धोटे*

*लोकनेते आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा तालुका जिवतीच्या वतीने कोरोना योद्धा व सरपंच,उपसरपंच यांचा सत्कार संभारंभ संपन्न*

भारतीय जनता पार्टी तालुका जिवतीच्या वतीने लोकनेते, विकास पुरुष आ.सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त कोरोना काळात मोलाची भूमिका बजवणारे कोरोना योद्धा डॉक्टर, नर्स,आशावर्कर,परिचारिका,सफाई कामगार व ईतर आरोग्य कर्मचारी तसेच गावाचा कारभारी गावचा सरपंच, उपसरपंच यांच्या पदाचा कार्यकाळ पूर्ण झाल्याबद्दल त्यांचा सत्कार समारंभ विदर्भ महाविद्यालय जिवती येथे आयोजित करण्यात आला,या कार्यक्रमाचे अध्यक्ष मनुन राजुरा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार अँड संजय धोटे हे प्रामुख्याने उपस्थित होते,

या कार्यक्रमा प्रसंगी बोलताना माजी आमदार अँड संजय धोटे मनाले की,सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या मंत्री पदाच्या कार्यकाळात चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासासाठी खूप मोठे योगदान दिले,त्यांच्या कार्यकाळात जिवती तालुक्यात तसेच जिवती शहरात अनेक विकास कामे मार्गी लागेल, आरोग्य संदर्भात खास करून लक्ष दिले,जिवती येथील रुग्णलयाची ईमारत,शेणगांव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची ईमारत,जिवती शहरात अनेक सिमेंटचे रस्ते,पिण्याच्या पाण्यासाठी विशेष काळजी करून निधी उपलब्ध करुन दिला, तसेच अनेक योजनेच्या माध्यमातून कामे मंजूर करून निधी मंजूर करून दिला,आ.सुधीर मुनगंटीवार हे गोरगरीब जनतेच्या सेवेसाठी नेहमी तत्पर असतात,गोरगरीब जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवणारा नेता आ सुधीर मुनगंटीवार असून या लोकनेत्याला वाढदिवसा निमित्ताने भरभरून शुभेच्छा सह बोलताना सांगितले.यावेळी उपस्थित कोरोना योद्धा तसेच सरपंच,उपसरपंच यांचा प्रमाणपत्र, भेट वस्तू देवून सत्कार करण्यात आला,

यावेळी मंचावर राजुरा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार अँड संजय धोटे यांच्या सह भाजयुमो जिल्हा महामंत्री महेश देवकते,भाजपचे तालुका अध्यक्ष केशव गिरमाजी,भाजपा तालुका महामंत्री सुरेश केंद्रे,भाजपा तालुका महामंत्री दत्ताजी राठोड,माजी सभापती जिल्हा परिषद सौ गोदावरी केंद्रे,जिल्हा परिषद सदस्य सौ कमलाबाई राठोड,भाजपा महिला आघाडी शहर अध्यक्ष अमृतवर्षा पिलेवाड,राजेश हरी राठोड, राजेश राठोड,जेष्ठ नेते गोपीनाथ चव्हाण,सुभाष पवार,सखुरे मामा,बुध्दाजी मेश्राम,फरीद शेख,निझाम शेख,विजय गोतावले,श्रीदास राठोड, पांढरी वाघमारे, नामदेव सलगर,खंडू सलगर,दीपक ढगे,बालाजी भुते,संतोष जाधव, बालाजी करले, किशोर चांदूरे, अनिल राठोड,विनायक राठोड, विठ्ठल चव्हाण,मनमंत वारे,लक्ष्मण बिरादार,बळीराम राठोड, व्यंकटी कोटांबे, संग्राम बाजगिर,शिवाजी बाईनवड, गणेश मरके आदी मान्यवर उपस्थित होते,कार्यक्रमा प्रसंगी जिवती तसेच परिसरातील डॉक्टर,नर्स,आशावर्कर परिचारिका,सफाई कामगार,तसेच सरपंच,उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here