Home विशेष कोरोनानंतर केसगळतीची समस्या, ११ लाख नागरिकांना टक्कल पडण्याची भीती

कोरोनानंतर केसगळतीची समस्या, ११ लाख नागरिकांना टक्कल पडण्याची भीती

41
0

Pratikar News

Jul 31, 2021

By

Nilesh Nagrale

नागपूर : डोक्‍यावरचे केस स्त्री-पुरुषांच्या सौंदर्यात भर पाडते. परंतु, आजच्या धकाधकीच्या आयुष्यात केसांना जणू नजर लागली आहे. लहानपणापासूनच जिंकण्यासाठी सुरू झालेल्या ‘रेस’ने जीवनात ‘स्ट्रेस’ वाढविला. त्यात योग्य आहाराचा अभाव, प्रदूषण आणि कोरोनाच्या संक्रमणात वापरलेले स्टेरॉईड केसगळतीसाठी (hair fall problems) कारणीभूत ठरत आहे. शहरातील तब्बल ११ लाख नागरिकांना टक्कल पडण्याची भीती आहे. पुरूषांपेक्षा महिला केसगळतीच्या समस्येने जास्त तणावात आहेत. (hair fall problem starts after corona due to steroids in nagpur)

तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार औषधोपचारांपेक्षा खबरदारी चांगली हे ऐकायला बरे वाटत असले तर कोरोना व्याधीचा धसका घेतल्यानंतर आलेला अशक्तपणा आणि नैराश्य यामुळे केसगळतीची समस्या प्रचंड वाढली आहे. कोरोना संसर्गानंतर मनुष्य भावनिक, मानसिक आणि शारीरिकरित्या खचून जातो. आनुवंशिकता केसगळीतीचे मुख्य कारण आहे. मात्र कोरोनामुळे शरीरातील ऑक्सिजन कमी होते. तसेच कोरोनाच्या भितीने आपोआपच मनात तणाव (टेलोजेन एफ्लुवियम) निर्माण होते. यामुळे केसांच्या मुळांना पुरेसे ऑक्सिजन मिळत नाही. त्यातच कोरोनाबाधितांना उपचारादरम्यान वापरलेल्या स्ट्रेराईडमुळे सुमारे २० टक्के रुग्णांना केसगळतीचा त्रास सहन करावा लागणार असल्याचे प्रसिद्ध केशरोपण तज्ज्ञ डॉ. सुरेश चावरे यांनी वर्तविले.

जिल्ह्यात २० लाख व्यक्तीं केसगळतीने त्रस्त –

सध्या केसगळतीने सारेच त्रस्त असून साधारणपणे १० व्यक्तींमध्ये ४ जण केसगळतीच्या समस्येला तोंड देत आहेत. नागपूर जिल्ह्याचा विचार करता ५० लाख लोकसंख्येत सुमारे २० लाख व्यक्तीं केसगळतीच्या समस्येने त्रस्त आहेत. विशेष असे की, यात पुरुषांच्या तुलनेत महिलांची संख्या अधिक आहे.

महिलांमधील केसगळती

महिलांमध्ये प्रसूतीनंतर केस गळतात तसेच रजोनिवृत्तीनंतर दोन तृतियांश महिलांमध्ये नैसर्गिकरित्या केस गळती दिसून येते. कॅन्सर, थायरॉईड, रक्तक्षयासारख्या गंभीर आजारामुळे केसगळती होते. मात्र याशिवाय वेळी-अवेळी खाणे, झोप पूर्ण न होणे, झोपेच्या वेळा बदलणे यामुळे केसगळतीचा त्रास होतो. तसेच मानसिक शारीरिक ताण वाढल्यानेही केसांच्या समस्या महिलांमध्ये निर्माण होतात.

केसांना घेऊ द्या मोकळा श्वास –

  • केस कोरडे करताना ड्रायर अतिवापर करू नये
  • ओले केस कोंबणे, किंवा विंचरणेही केसांसाठी त्रासदायक आहे
  • लहान मुलीं क्लिपमध्ये खूप घट्ट केस बांधल्यामुळे केसांना त्रास होतो.

मुलांना का देता ताण?

ट्रायकोटिलोमॅनिया हा एक मानसिक आजार आहे. लहान मुलांवर अधिक ताण दिल्यामुळे त्यांच्या मनावर परिणाम होतो. चिंता सतावते. यामुळे केस गळतीचा त्रास होण्याची भीती आहे. लहान मुलांमध्ये योग्य वाढीसाठी आणि विकासासाठी पुरेसे पोषक द्रव्ये मिळत नाहीत, यामुळे केसगळती होण्याची भीती आहे.

पुरुषांमधील केसगळती

पुरुषांमधील सर्वाधिक केसगळती ही आनुवंशिकतेमुळे होते. मात्र कोरोनाच्या समस्येनंतर बुरशीचे आजार झाल्यास पुरुषांना केसांची अधिक समस्या भेडसावते. गंभीर आजार तसेच चिंतेमुळे काही प्रमाणात केस गळतीचा त्रास जाणवतो.

सामान्यतः दररोज ५० ते १०० केस गमावतो. यापेक्षा अधिक प्रमाणात गळत असतील तर चिंताजनक असून डॉक्टरचा सल्ला घेण्याची गरज आहे. आयुष्यातील तणाव कमी कसा होईल, याचा विचार करावा. चांगला आहार तसेच व्यायाम करावा. विचारपूर्वक हेयरड्रेसींगचं तंत्र वापरावे. केसगळती वाढली तर केसगळती न होऊ देणारी औषधं डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घ्यावी.

-डॉ. सुरेश चावरे, केशरोपण तज्ज्ञ, नागपूर.

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here